औरंगाबाद : स्मार्ट शहर बसला दिला माजी सैनिकांनी आधार

उत्पन्न वाढीबद्दल चालक-वाहकांचा सत्कार

Aurangabad Smart City Bus
Aurangabad Smart City Bussakal

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याचा संप मिटत नसल्याने औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनची शहर बस सेवा अडचणीत सापडली होती. मात्र माजी सैनिकांनी शहर बसला आधार दिला आहे. एवढेच नाही तर शहर बसचे उत्पन्न देखील वाढवून दिले आहे. त्यामुळे चालक समाधान चव्हाण व वाहक संदीप कोळगे यांचा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे बुधवारी (ता. २३) सत्कार करण्यात आला. (Aurangabad Smart City Bus)

स्मार्ट सिटीच्या मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला औरंगाबाद स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम आणि स्मार्ट शहर बस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवणीकर यांची उपस्थिती होती. यावेळी पवणीकर म्हणाले की, उत्पन्न वाढवणे हा दुय्यम विषय आहे, प्रवाशांच्या सेवेला प्राधान्य आहे. अरुण शिंदे यांनी अशाच प्रकारे उत्कृष्ट सेवा बजावण्याचे आवाहन चालक वाहकांना केले. यावेळी स्मार्ट शहर बस विभागातील उपव्यवस्थापक मुकुंद देव, सिद्धार्थ बनसोड, सहायक व्यवस्थापक माणिक निला, विश्‍लेषक सागर इंगळे, वाहतूक अधीक्षक बंडू वाघ उपस्थित होते. दरम्यान महापालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटी सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी चालक-वाहकांना शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com