esakal | औरंगाबादेत कोरोनाकंप....आज ५५ पॉझिटिव्ह, @७४३
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaVirus News

शहरात अवघ्या ३६ तासात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असतानाच आज (ता. १४) तब्ब्ल ५५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७४३ झाली आहे. मृत्यूचा आकडाही चिंताजनक असून तो १९ वर पोचला आहे.

औरंगाबादेत कोरोनाकंप....आज ५५ पॉझिटिव्ह, @७४३

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : शहरात अवघ्या ३६ तासात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असतानाच आज (ता. १४) तब्ब्ल ५५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७४३ झाली आहे. मृत्यूचा आकडाही चिंताजनक आहे.

एकूण २१० जण कोरोनमुक्त

जिल्हा रुग्णालयातून (मिनी घाटी) काल सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये औरंगाबाद शहराच्या संजय नगरातील चार, किल्लेअर्क आणि नूर कॉलनीतील प्रत्येकी एक असे एकूण सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये चार महिला आणि दोन पुरूष आहेत.

हेही वाचा-  शेतकऱ्यांनो सावधान!!! तीन दिवस आहे जोरदार वादळी वारा

दोन घाटीतील रुग्णांनाही डिस्चार्ज मिळाल्याने एकूण आठ कोरोनाबाधित रुग्ण आज कोरोनामुक्त झाल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सांगितले. आतापर्यंत ७० जण मिनी घाटीतून, घाटीतून तीन, मनपाच्या कोविड केअर केंद्रातून १३२, खासगी रुग्णालयातून पाच असे एकूण २१० जण बरे होऊन घरी गेले आहेत.

या भागात आढळले रुग्ण
भीमनगर भावसिंगपुरा -१५
शिवपुरी पडेगाव -१
उस्मानपुरा -७
सिल्कमिल कॉलनी -१
कांचनवाडी -१
नारळीबाग -१
आरटीओ कार्यालय -२
गरमपाणी -१
बन्सीलाल नगर -१
सातारा परीसर -२
सातारा ग्रामपंचायत -५
सातारा खंडोबा मंदिरजवळ -१
संजयनगर -३
हुसेन कॉलनी -२
दत्तनगर गल्ली न. ५- १
न्यायनगर -२
पुंडलिकनगर -१
गुरूनगर -१
न्यू नंदनवन कॉलनी -१
गारखेडा -१
शहानूरवाडी -१
बेगमपुरा -१
पंचशील दरवाजा किलेअर्क -१
इतर -२
एकूण ५५

कोरोना मिटर
उपचार घेणारे रुग्ण - ५१४
बरे झालेले रुग्ण - २१०
एकूण मृत्यू      - १९
एकूण रुग्णसंख्या - ७४३

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

loading image