Sillod Crime News : तक्रार दिल्याच्या रागातून विवाहितेला मारहाण, सात जणांवर गुन्हा दाखल

पतीसोबत प्रेमसंबंध असल्यामुळे महिलेने संबंधित महिलेविरोधात भोकरदन न्यायालयात तक्रार दाखल केली.
तक्रार दिल्याच्या रागातून विवाहितेला मारहाण, सात जणांवर गुन्हा दाखल
तक्रार दिल्याच्या रागातून विवाहितेला मारहाण, सात जणांवर गुन्हा दाखलsakal

सिल्लोड : पतीसोबत प्रेमसंबंध असल्यामुळे महिलेने संबंधित महिलेविरोधात भोकरदन न्यायालयात तक्रार दाखल केली. याच राग मनात धरून तक्रारदार महिलेस तिच्या पतीसह नातेवाइक व संबंधित महिलेने मारहाण केली.

ही घटना अन्वी (ता.सिल्लोड) येथे २९ फेब्रुवारी रोजी घडली होती. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी (ता.१३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अन्वी (ता.सिल्लोड) येथील फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले की, तिच्या पतीचे रहिमाबाद येथील महिलेशी प्रेमसंबंध असल्याने तिने भोकरदन न्यायालयात संबंधित महिलेविरोधात तक्रार दाखल केली.

याचा राग मनात धरून पतीसह संबंधित महिला व नातेवाइकांनी तिला मारहाण केली. पतीने दगड मारून डोके फोडले. तर दिराने चाकूने कानावर वार करून जखमी केले व सर्वांनी मिळून जीवे मारण्याची धमकी दिली.

फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी पती गफूरखाँ अय्युबखाँ पठाण (रा. रहिमाबाद, ता. सिल्लोड) येथील एक महिला व दीर हमिदखाँ अय्युबखाँ पठाण, नाजीमखाँ अय्युबखाँ पठाण,

खातुनबी अय्युबखाँ पठाण, फातमाबी नाजीमखाँ पठाण, साकिनाबी हमीदखाँ पठाण (सर्व रा.अन्वी, ता. सिल्लोड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बीट अंमलदार सचिन काळे, संजय आगे करित आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com