esakal | बेमोसमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र


कोरोनामुळे शेतकरीवर्ग पुरता हैराण झाला आहे. शेतातील भाजीपाला बाजारात आणता येत नसल्याने होणारे नुकसान सहन करावे लागत असतानाच बुधवारी  झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे शेतातील रब्बी पिके तसेच कापून ठेवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

बेमोसमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान

sakal_logo
By
राजेभाऊ मोगल

औरंगाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे शेतकरीवर्ग पुरता हैराण झाला आहे. शेतातील भाजीपाला बाजारात आणता येत नसल्याने होणारे नुकसान सहन करावे लागत असतानाच बुधवारी (ता.२५) झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे शेतातील रब्बी पिके तसेच कापून ठेवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस हिंगोली (२१.२४), त्यापाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यात (१२.४४ मी.मी.) झाला असून विभागात एकूण ९.७५ मि.मी. पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर आता दुहेरी संकट ओढावले आहे.

हेही वाचा - कोरोना पेक्षा सारीचा ताप भयंकर औरंगाबादेत आठ रुग्ण

 दुपारनंतर अवकाळी पावसाचा तडाखा
बुधवारी दुपारनंतर अवकाळी पावसाचा तडाखा बसला. मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस हा हिंगोली जिल्ह्यात झाला असून, कळमनुरी तालुक्यात २८.८८ मि.मी. झाला. त्यापाठोपाठ औंढा तालुक्यात २७.०१ मि.मी. एवढा पाऊस झाला. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यात १२.४४ मि.मी. झाल्याची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस खुलताबाद तालुक्यात ३६.६६ मि.मी. झाला. बीड जिल्ह्यात १०.५० मि.मी. पाऊस झाला असून, जिल्ह्यात सर्वाधिक २०.६० मि.मी.पाऊस अंबाजोगाई तालुक्यात झाला.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

 असा झाला पाऊस
जालना जिल्ह्यात ८.९४ मि.मी. एवढी नोंद झाली असून, जिल्ह्यात सर्वाधिक ११.६४ मि.मी. पाऊस भोकरदन तालुक्यात झाला. नांदेड जिल्ह्यात ८.३० मि.मी. अशी नोंद असून जिल्ह्यात सर्वाधिक १८.१९ मि.मी. पाऊस माहूर तालुक्यात झाला. लातूर जिल्ह्यात ७.०६ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्यात सर्वाधिक १४ मि.मी. पाऊस रेणापूर तालुक्यात झाला. परभणी जिल्ह्यात ६.९६ एवढा पाऊस झाला असून जिल्ह्यात सर्वाधिक १४.८७ पाऊस गंगाखेड तालुक्यात झाला. विभागात सर्वांत कमी पाऊस उस्मानाबाद जिल्ह्यात ६.०८ मि.मी. झाला असून, जिल्ह्यात सर्वाधिक ११.९३ मि.मी. एवढा पाऊस हा कळंब तालुक्यात झाला.  दरम्यान, गुरुवारी (ता.२६) आकाशात ढगांची गर्दी व ऊन सावलीचा खेळ सुरू होता. यामुळे पावसाची शक्यताही कायम होती. बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने सोंगणी करून ठेवलेल्या ज्वारी, उन्हाळी बाजरी, गहू भिजून पिकांचे नुकसान झाले. फळपिकांची देखील या वादळासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत.
महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्यात झालेला जिल्हानिहाय पाऊस (मि.मी. मध्ये)
औरंगाबाद - १२.४४
जालना - ८.९४
बीड - १०.५०
लातूर - ७.०६
उस्मानाबाद - ६.०८
नांदेड - ८.३०
परभणी - ६.९६
हिंगोली - २१.२४

loading image