

“AI Cannot Express Human Emotions,” Claims Arvind Jagtap
Sakal
छत्रपती संभाजीनगर: ‘राजकारणातील एक काळ असा होता की सुसंस्कृत राजकारण केले जात होते; मात्र आताची राजकारणी मंडळी डांबरट निघाली. सर्वसामान्य नागरिकांना समजण्या इतपत आताचे राजकारण राहिले नाही. दिवसेंदिवस सर्वसामान्य माणसांकडून प्रश्न विचारण्याची जिज्ञासा कमी झाली. लेखक, कवी यांनी नेहमीच अन्यायाविरोधातच भूमिका घेतलेली; परंतु आजकालचे राजकारणी हे वाचतच नाहीत, अशी खंत लेखक अरविंद जगताप यांनी व्यक्त केली.