esakal | औरंगाबाद: जीव धोक्यात घालून कर्तव्यासाठी ‘ती’ने काढली पुरातून वाट । Vaccination
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद: जीव धोक्यात घालून कर्तव्यासाठी ‘ती’ने काढली पुरातून वाट

औरंगाबाद: जीव धोक्यात घालून कर्तव्यासाठी ‘ती’ने काढली पुरातून वाट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्री (ता.१) मुसळधार पाऊस झाला. नदी-नाल्याला पूर आला असेल याची कल्पना नसताना केवळ आपली कर्तव्य बजावण्यासाठी आरोग्य सेविका ही आपल्या मुळ कामाच्या ठिकाणाहून २२ किलोमीटर अंतर पार करत लसीकरणासाठी निघाली.

गावात पोहचण्या अगोदर गावातील ओढ्याला आलेल्या पुरातून आपला जीव धोक्यात घालून ‘ती’ने वाट काढत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीदिनी शनिवारी (ता.३) २५० नागरिकांना कोरोनाची लस दिली. कोरोना लसीकरणासाठी पुराशी दोन हात करणाऱ्या मीना बुट्टे या आरोग्य सेविकेचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या या आरोग्यसेविकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

हेही वाचा: औरंगाबाद: स्टार्ट अप-लॉकडाऊनने दाखविली व्यवसायाची दिशा

गंगापुर तालुक्यातील शेंदुरवादा आरोग्य केंद्रातील दरेगाव येथील आरोग्य सेविका मीना बुट्टे या सावखेडा येथे लसीकरणासाठी निघाल्या. शनिवारी सकाळी नऊ वाजताच बाहेर पडलेल्या बुट्टे यांची वाट नांद्राबाद जवळील ओढ्याला आलेल्या पुराने अडविली. ओढ्याला पूर आलेला होता, पाणी वेगाने वाहत होते. ओढ्याच्या पैलतीरावर असंख्य लोक उभे होते. अनेक जण पाण्याचा प्रवाह कमी होण्याचीही वाट बघत होते. मात्र लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी उशीर होईल, या चिंतेत असलेल्या बुट्टे कोणताही विचार न करता सरळ पाण्यात उतरल्या. त्यांचे धाडस पाहून उपस्थितांनाही आश्चर्य वाटले, अनेकांनी पाणी कमी होण्याची वाट बघा असा सल्ला दिला. मात्र त्या थांबल्या नाहीत.

अखेर ओढ्याच्या मधोमध गेल्यावर एका मुलाने त्यांना साथ दिली. अन् बघता बघता या आरोग्य सेविकेने ओढा पार केला. ओढ्याच्या किनारी असलेल्या उपस्थितांपैकी कुणीतरी याचा व्हिडिओ बनवला आणि तो लगेचच व्हायरल झाला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर शेळके यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला. त्यांनी तो सीईओ डॉ. निलेश गटणे यांना दाखविला. सीईओंनी मीना बुट्टे यांचे अभिनंदन केले. आरोग्य विभागाच्या असंख्य ग्रुपवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य सेविकेच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे.

हेही वाचा: मित्रानेच केला मित्राचा खून, औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार

"गंगापुर तालुक्यातील आरोग्य शेंदुरवादा आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या दरेगाव येथे माझी नियुक्ती आहे. मात्र महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सावखेडा येथे लसीकरण शिबिर ठेवण्यात आले होते. गावात जाताना नांद्राबाद जवळील ओढ्याला पूर आला होता. लसीकरणाला उशीर होऊ नये म्हणून मी ओढा पार करण्याचा निर्णय घेतला. गावात गेल्यानंतर सांयकाळी साडे पाच वाजेपर्यंत २५० नागरिकांना कोरोनाची लस दिली."- मीना बुट्टे, आरोग्य सेविका.

loading image
go to top