Aurangabad Crime : एमपीडीएखाली ‘टिप्या’दुसऱ्यांदा स्थानबद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Crime

Aurangabad Crime : एमपीडीएखाली ‘टिप्या’दुसऱ्यांदा स्थानबद्ध

औरंगाबाद : गुन्ह्यांच्या आलेख वाढल्याने अट्टल आरोपी शेख जावेद ऊर्फ टिप्या शेख मकसुद (२८, रा. विजयनगर चौक, गारखेडा) याला दुसऱ्यांदा एमपीडीएखाली स्थानबध्द करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी २२ नोव्हेंबर रोजी टिप्याविरोधातील आदेश जारी केले आहेत.

हेही वाचा: Delhi Pollution: बांधकामांवरील निर्बंध मागे; शाळा सुरु होण्याची शक्यता

टिप्याविरोधात पुंडलीकनगर व एमआयडीसी सिडको या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात बेकायदेशिर जमाव जमविणे, अपराधासाठी चिथावणी देणे, नशा करुन सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणे, अश्लील कृत्य करणे, लोकसेवकाच्या आदेशाचे उल्लंघन करणे. बेकायदेशिरपणे शस्त्र बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, डांबून ठेवणे, अपहरण करणे, खंडणी व खुन करण्यासाठी अपहरण करणे, ठार मारण्याची भिती घालून खंडणी वसूल करणे, जबरी चोरी करताना दुखापत करणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. ‘टिप्या’विरोधात २०१९ मध्ये एमपीडीएअॅक्टनुसार स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली होती, त्याच्या वागणुकीत किंचीतही फरक झाला नाही, उलट त्याच्या गुन्ह्यांचा आलेख वाढत होता. त्याला २२ नोवेंबर रोजी तामील करून मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक आघाव यांनी दिली.

हेही वाचा: प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी ST संपकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढा - HC

शहरातून ३३ गुन्हेगार हद्दपार

शहरातून तब्बल ३३ गुन्हेगार हद्दपार करण्यात आले आहेत. पोलिस उपायुक्त परिमंडळ एकमधून १७ गुन्हेगार, तर परिमंडळ दोन मधून १६ हद्दपार करण्यात आले आहेत. याशिवाय २०२१ मधील ९ आणि २०२० सालातील ४ गुन्हेगार अजूनही एमपीडीएखाली स्थानबद्ध असल्याची माहिती श्री. आघाव यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

loading image
go to top