शिरसाट, भुमरेंच्या मंत्रीपदाची शक्यता वाढली, सावेंचा पत्ता कट?

मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे, संजय शिरसाट यांना मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता वाढली आहे.
Shinde fadanvis govt cabinet expansion mla Sanjay Shirsat Sandipanrao Bhumre Abdul Sattar maharashtra politics aurangabad
Shinde fadanvis govt cabinet expansion mla Sanjay Shirsat Sandipanrao Bhumre Abdul Sattar maharashtra politics aurangabadsakal

औरंगाबाद : मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे, संजय शिरसाट यांना मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता वाढली आहे. तसेच माजी मंत्री अब्दुल सत्तार हे दोन दिवसांपासून मुंबईतच तळ ठोकून असल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या आमदारांचा मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बाहेर पडला आणि राज्यात सत्तांतर झाले. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक आमदारांनी शिंदे यांना साथ दिली आहे. औरंगाबाद पश्‍चिमचे संजय शिरसाट , मध्यचे प्रदीप जैस्वाल, पैठणचे संदीपान भुमरे, सिल्लोडचे अब्दुल सत्तार आणि वैजापूरचे रमेश बोरनारे हे पाच आमदार शिंदे गटासोबत गेले. यात संदीपान भुमरे कॅबिनेट मंत्री तर अब्दुल सत्तार राज्यमंत्री होते.

सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अनेकांनी मंत्रीमंडळात समावेश होण्यासाठी फिल्डींग लावली. त्यात श्री. शिरसाट, अब्दुल सत्तार यांनी मुंबईत शक्तीप्रदर्शन केले. माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिर सभेसाठी अभुतपुर्व गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन केले. आता मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला आहे. यामुळे हालचालींना वेग आला आहे. संदीपान भुमरे आणि संजय शिरसाट यांची नावे शिंदे गटाकडून पुढे आले आहेत. शिंदे गटाच्या आमदारांना मुंबईला बोलावण्यात आले आहे . तर अब्दुल सत्तार हे दोन दिवसांपासून मुंबईतच तळ ठोकून असल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या तोंडावरच अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे टीईटी घोटाळ्यात आल्याने सध्या तरी सत्तार यांची अडचण झाल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

जिथे सत्ता तिथे ‘सत्ता'र असे अब्दुल सत्तार सांगतात, आताही सत्तेत मंत्रीपद मिळण्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे. मात्र मंत्रीमंडळ विस्तारापूर्वीच टीईटी घोटाळ्यात त्यांच्या मुलींची नावे पुढे आल्याने त्यांच्यापुढील मार्ग बिकट झाला आहे, यातुन मुख्यमंत्री शिंदे आणि आमदर सत्तार काय मार्ग काढतील त्यावर त्यांचे मंत्रीपद अवलंबून राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com