Chhatrapati Sambhajinagar : निष्क्रिय पदाधिकारी हटविणार; शिवसेना ठाकरे गटाच्या निरीक्षकांचा आढावा बैठकीत इशारा
Chhatrapati Sambhajinagar : निष्क्रिय पदाधिकारी हटविणार; शिवसेना ठाकरे गटाच्या निरीक्षकांचा आढावा बैठकीत इशाराSakal

Chhatrapati Sambhajinagar : निष्क्रिय पदाधिकारी हटविणार; शिवसेना ठाकरे गटाच्या निरीक्षकांचा आढावा बैठकीत इशारा

निष्क्रिय आणि फक्त पुढे-पुढे मिरवत काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हटविण्यात येईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ समन्वयक प्रदीपकुमार खोपडे यांनी गुरुवारी (ता. सात) आढावा बैठकीत दिला.

छत्रपती संभाजीनगर : निष्क्रिय आणि फक्त पुढे-पुढे मिरवत काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हटविण्यात येईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ समन्वयक प्रदीपकुमार खोपडे यांनी गुरुवारी (ता. सात) आढावा बैठकीत दिला.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाचे शहरात बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यासोबतच आता लोकसभा मतदारसंघासाठी समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मध्य विधानसभा मतदारसंघाची समन्वयक खोपडे यांनी बुधवारी औरंगपुरा येथील शिवसेना भवनात बैठक घेतली. यावेळी नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, आनंद तांदुळवाडीकर, गणू पांडे, अनिल पोलकर, राजू इंगळे, सुधीर नाईक, सचिन झवेरी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी आदींसह इतरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

खोपडे पुढे म्हणाले, अनेक पदाधिकारी केवळ पदे घेऊन पुढे-पुढे करतात, पण कामे करत नाहीत. अशा पदाधिकाऱ्यांना पदावरून शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेऊन हटविले जाईल, त्यावेळी वाईट वाटून घेऊ नका, असा इशारा दिला. गेल्यावेळी थोडक्या मतांनी गेलेली ही जागा यावेळी बहुमताने जिंकून आणण्यासाठी एकदिलाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

खैरेंच्या नावावर शिक्कामोर्तब?

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नसले, तरी मध्य विधानसभा मतदारसंघ निरीक्षक विलास राणे यांनी भाषणाच्या ओघात यावेळी तुमचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे आहे, असे आवाहन केले. त्यामुळे खैरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा यावेळी सुरू झाली.

अनेकांचा पक्षप्रवेश

यावेळी नितीन कांबळे यांच्यासह कलीम खान, हिरालाल कांबळे, दीपक कांबळे, गौतम खरात, नंदू जाधव, शेख शकील, शेख जहीर, राम कांबळे, मिलिंद जाधव, शुभम आठवले, शेख मजहर, जुबेर चाऊस व इतरांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com