
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा महायुती सरकारला विसर पडल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे बुधवारी (ता. ११) ‘क्या हुआ तेरा वादा’ आंदोलन केले. त्यात सुमारे १०० ट्रॅक्टर घेऊन पक्षाचे नेते विभागीय आयुक्तालयावर धडकले. माजी खासदार चंद्राकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्तांना निवेदन दिले.