
छत्रपती संभाजीनगर : प्रमोद पाडसवान खून प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती हाती लागत असून ज्ञानेश्वर निमोणेच्या आईने तिन्ही मुलांना आणि पतीला शस्त्रे आणून दिली. एवढेच नव्हे तर निमोणेकडे चाकूची दोन कव्हर्स सापडली असली तरी प्रत्यक्षात एकच चाकू जप्त करण्यात आल्याने पोलिस आता या चाकूसह इतर शस्त्रांचा शोध घेत आहेत.