esakal | भाडे द्या नाहीतर दुकाने रिकामी करा 
sakal

बोलून बातमी शोधा

भाडे द्या नाहीतर दुकाने रिकामी करा 

लॉकडाऊन जाहिर झाल्यापासून दुकाने बंद आहे. विशेष म्हणजे कपडा, कुलर, आईसक्रीम, ज्युस, फर्निचर अशा अनेक व्यावसायिकांचा सिझन गेला आहे. दुकान मालकांनी हे भाडे माफ करावी अशी माफक अपेक्षा दुकानदारांची आहे. मात्र भाडे तर द्यावेच लागणार नाही तर दुकान रिकामे करा, अनेकजण ते घेण्यास तयार आहे असे निरोप दुकानदारांना मालकांकडून मिळत आहे.

भाडे द्या नाहीतर दुकाने रिकामी करा 

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद:  लॉकडाऊनमध्ये व्यापारी, दुकानदारांचा व्यवसाय पुर्णपणे बुडाला, बहुतांश जणांचा वर्षभराचा सिझन गेला. आता पुढील आठ महिने कसे काढावे या चिंतेत अनेक जणांना झोप येत नसतांना आता ज्यांची दुकाने भाड्याने आहे त्यांना मालकांकडून भाडे देण्यासाठी विचारणा केली जात आहे. भाडे तर द्यावेच लागेल नाही तर दुकान रिकामे करा असे फर्मान काही जण सोडत आहेत तर काही मालकांनी मन मोठे करुन लॉकडाऊनच्या काळातील दुकानांचे संपुर्ण भाडेच माफ केले. करारानुसार काही दुकानांची दहा ते पंधरा टक्के दरवर्षी भाडेवाढ असते. ती सुद्धा दुकानदारांना आर्थिक संकटात नेणारी आहे. 

चाळीस ते पन्नास टक्के दुकाने भाड्याने 

शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील जवळपास चाळीत ते पन्नास टक्के दुकाने भाडेतत्त्वावर आहेत. साधरपणे दहा ते पन्नास हजार तर काही ठिकाणी हे लाखात सुद्धा आहे. मात्र लॉकडाऊन जाहिर झाल्यापासून दुकाने बंद आहे. विशेष म्हणजे कपडा, कुलर, आईसक्रीम, ज्युस, फर्निचर अशा अनेक व्यावसायिकांचा सिझन गेला आहे. दुकान मालकांनी हे भाडे माफ करावी अशी माफक अपेक्षा दुकानदारांची आहे. मात्र भाडे तर द्यावेच लागणार नाही तर दुकान रिकामे करा, अनेकजण ते घेण्यास तयार आहे असे निरोप दुकानदारांना मालकांकडून मिळत आहे. तथापि, काही दुकानदारांनी पूर्ण तर काहींनी २५, ५० टक्के भाडे माफ करण्याचीही तयारी दर्शविली आहे.

खासगी पेक्षा सरकारीत गर्दी कशाची वाचा...

व्यापारी म्हणतात... 

शहरात महापालिका, वक्फ बोर्डाची दुकाने आहे. या दुकानांचे भाडे माफ करण्यात यावे असे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. मागील अडीच महिन्यांपासून त्यांच्या खिशात एक रुपयासुद्धा आलेला नाही. उलट त्यांच्याकडील माल पडलेला असल्याने ते संकटात सापडले आहे. त्यामुळे शासकीय संस्थांनी तरी त्यांच्याकडील दुकानांचे भाडे माफ करावे, अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करत आहे. 
 

मी साडेसात लाखांचे भाडे माफ केले 

युसुफ मुकाती (दुकान मालक) माझे पैठणगेट येथील फॅशन बाजार मध्ये १८ दुकाने आहेत मी ७२ दिवसांचे साडेसात लाखांचे भाडे पुर्णपुणे माफ केले आहे. मी इतर मालकांना सुद्धा आवाहन करतो की त्यांनी सुद्धा मन मोठे करुन भाडे माफ करावे. संकटाच्या काळात आपण एकमेकांना साथ द्यायला हवी. भाडेकरु जगले तर दुकान मालक जगेल. 

मालकांनी मन मोठे करावे 

जगन्नाथ काळे (अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ)  
अनेक दुकाने ही भाड्याने आहेत व्यवसाय नसल्याने दुकानदार अडचणीत असल्याने मालकांनी मन मोठे करायला हवे. तसेच महापालिकेने त्यांच्या मालकीच्या दुकानांचे भाडे माफ करण्याची आम्ही मागणी करणार आहोत. सध्या सर्वच जण आर्थिक संकटात अडचणीत आहे. 

भाडेमाफीसाठी दुकान मालकांना पत्र 

ज्ञानेश्‍वरअप्पा खर्डे (कॅनॉट व्यापारी असोसिएशन)
 अडीच महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे अडीच महिन्यांचे भाडे मालकांनी माफ करावे. तसेच जुन महिन्याचे भाडे सुद्धा अर्धेच घ्यावे, असे विनंती मात्र आम्ही दुकान मालकांना देणार आहोत. 

loading image