कान्हाच्या डरकाळीचा विक्रम ! ; वाघीण अर्पिताचे बछडे पाच महिन्यांनंतर पिंजऱ्याबाहेर येऊन बागडले

प्राणिसंग्रहालयातील अर्पिता या वाघिणीने दोन बछड्यांना जन्म दिला होता. त्यांचे कान्हा, विक्रम असे नामकरण करण्यात आले होते. या दोन्ही बछड्यांना मंगळवारी (ता. सहा) पहिल्यांदाच पिंजऱ्यातून बाहेर सोडण्यात आले.
Siddharth Garden and Zoo
Siddharth Garden and Zoosakal

सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालय : प्राणिसंग्रहालयातील अर्पिता या वाघिणीने दोन बछड्यांना जन्म दिला होता. त्यांचे कान्हा, विक्रम असे नामकरण करण्यात आले होते. या दोन्ही बछड्यांना मंगळवारी (ता. सहा) पहिल्यांदाच पिंजऱ्यातून बाहेर सोडण्यात आले. खुल्या वातावरणात दोन्ही बछड्यांनी आईसोबत मुक्त संचार केला.

महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात राज्यातील इतर प्राणिसंग्रहालयांपेक्षा जास्त वाघ आहेत. महापालिकेने देशभर वाघ दिले आहेत. त्यामुळे वाघांचे शहर अशी ओळख तयार होत आहे.

Siddharth Garden and Zoo
Rajiv Gandhi Zoo : अखेर राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाचे ऑनलाई बुकिंग सुरु

दरम्यान, सात सप्टेंबर २०२३ ला अर्पिता व वीर या पांढऱ्या वाघांच्या जोडीपासून दोन बछड्यांचा जन्म झाला होता. त्यांचे कान्हा व विक्रम असे नामकरण करण्यात आले होते. पाच महिन्यांनंतर दोन्ही बछड्यांना प्रशासक जी. श्रीकांत यांच्या हस्ते पिंजऱ्याचे दार उघडून मोकळ्या वातावरणात सोडण्यात आले.

या दोन्ही बछड्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे काळजीवाहक मोहम्मद जिया यांनी सांगितले. यावेळी मुख्य उद्यान अधीक्षक विजय पाटील, प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी शेख शाहेद, पशुधन पर्यवेक्षक संजय नंदन यांची उपस्थिती होती. लवकरच सिद्धार्थ उद्यान येथे पर्यटकांच्या सोयीसाठी ई-टिकिटिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी जी. श्रीकांत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com