
छत्रपती संभाजीनगर : वादळी वाऱ्याने सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील डोमची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. ११) घडली. या दुर्दैवी घटनेनंतर महापालिकेने सात दिवस सिद्धार्थ उद्यान बंद ठेवले असून, गुरुवारी (ता. १२) बॅरिकेडिंग करून प्रवेशद्वार बंद करण्यात आले. बीओटी (बांधा-वापरा-हस्तांतरित करा) प्रकल्पाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार असून त्यासाठी खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेच्या बीओटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल (ता. १२) रोजी प्रकल्पाची पाहणी केली.