Chhatrapati Sambhajinagar: वाहनधारकांची पेट्रोल पंपांवर झुंबड; ‘नो स्टॉक’चे बोर्ड; शेतीकामे, विवाह सोहळ्यांसह वाहतुकीला मोठा फटका

Massive Crowds at Petrol Pumps: सिल्लोडमध्ये इंधन टंचाई अफवेमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी; ‘नो स्टॉक’चे बोर्ड लावले; ट्रॅक्टर आणि यंत्रसामुग्री कामे ठप्प
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

सिल्लोड: जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवेने गुरुवारी (ता.२६) वाहनधारकांनी सर्वच पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केली. समाजमाध्यमांवर पसरलेल्या या अफवेमुळे दुचाकी, चारचाकी वाहनांसह नागरिकांनी थेट कॅन आणि बाटल्या घेऊन रांगा लावल्या. अचानक झालेल्या या गर्दीमुळे अनेक पंपांवरील इंधनाचा साठा संपून ‘नो स्टॉक’चे बोर्ड लागले. परिणामी, ऐन हंगामातील शेतीकामे, विवाह सोहळे आणि सर्वसामान्यांच्या प्रवासाला मोठा फटका बसला असून, काही ठिकाणी रस्त्यांवर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com