Chh.Sambhaji Nagar : वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धेत सृष्टी साठेला रौप्यपदक

सृष्टीने आतापर्यंत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेत देशाला विविध पदके मिळून दिले आहेत.
sambhajinagar
sambhajinagarsakal

छत्रपती संभाजीनगर : आर्मेनिया देशात झालेल्या ज्युनिअर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या सृष्टी साठे हिने रौप्यपदक पटकाविले.हार्मेनिया येथे २४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान झालेल्या ज्युनिअर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सृष्टी साठे हिने भारताला रौप्यपदक मिळवून दिले.

सृष्टीने आतापर्यंत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेत देशाला विविध पदके मिळून दिले आहेत. यात गेल्या महिन्यात कझाकिस्तान येथे झालेल्या ज्युनिअर एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. तर गेल्या वर्षी तिने ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. सृष्टीला भारतीय खेल प्राधिकरणचे (साई) प्रशिक्षक सनी घेलावत यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com