CoronaUpdate: औरंगाबादेत सकाळी ६६ जण बाधित, जिल्ह्यात ३ हजार ६४१ रुग्णांवर उपचार

CoronaVirus
CoronaVirus

औरंगाबाद : जिल्ह्यात आज (ता . १६) सकाळच्या सत्रात ६६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात जिल्ह्यातील एकूण १ हजार पा जणांचे स्वॅब घेण्यात आले होते.
आज बाधित रुग्णांपैकी २१ शहरातील, ३१ ग्रामीण भागातील असून अँटीजेन चाचणीद्वारे १४ जण  बाधित झाल्याचे स्पष्ट झाले .

आतापर्यंत जिल्ह्यात ९ हजार ५१० जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ५ हजार ४९९ बरे झाले. एकूण ३७० जणांचा मृत्यू झाला. आता  ३ हजार ६४१ जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये १४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

शहरातील २१ रुग्ण

न्याय नगर, गारखेडा (१), संसार नगर (१), कांचनवाडी (१), छावणी (१), एन बारा सिडको (१), पीर बाजार उस्मानपुरा (१), एन चार सिडको (२), बेगमपुरा (३), प्रथमेश नगर, बीड बायपास, देवळाई रोड (१), अन्य (१), एन अकरा हडको (३),चिकलठाणा (१), जय भवानी नगर (१), पीर बाजार (१),शिव नगर (१),मिल कॉर्नर (१)

ग्रामीण भागातील ३१ रुग्ण

रांजणगाव (२), पोस्ट ऑफिस जवळ, गंगापूर (१), अक्षदपार्क,कुंभेफळ (१), करमाड (१), मोठी आळी, खुलताबाद (३), पळसवाडी, खुलताबाद (६), वेरूळ (२), मोरे चौक, बजाज नगर (२), आयोध्या नगर, बजाज नगर (४), राधाकृष्ण सो., तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर (१), बीएसएनएल गोडाऊन जवळ, बजाज नगर (१), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (१), म्हाडा कॉलनी, राम मंदिराजवळ, बजाज नगर (१), जय भवानी चौक, बजाज नगर (२), गोंडेगाव, सोयगाव (२), शास्त्री नगर, वैजापूर (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण -५४९९
उपचार घेणारे रुग्ण -३६४१
एकूण मृत्यू - ३७०
आतापर्यंत एकूण बाधित  -९५१०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com