
Crime News
sakal
छत्रपती संभाजीनगर : ‘लग्न करून देत नाही, शेतीची वाटणी करत नाही’ असे म्हणत दोन मुलांनी स्वत:च्या जन्मदात्याचा चाकूने वार करून खून केला. या प्रकरणात आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. गोरवाडे यांनी बुधवारी (ता. एक) ठोठावली.