
ST Workers Organize Mahaprasad Seva
Sakal
उमरगा : उमरगा आगारातील एस.टी. च्या कर्मचाऱ्यांनी गणेश उत्सवा निमित्त शनिवारी (ता. सहा) दिवसभर बसस्थानकात आलेल्या प्रवाशांसाठी अन्नदानाची (महाप्रसाद) सोय केली. बाहेरच्या आगारातील वाहक, चालकासह जवळपास सात ते आठ हजार प्रवाशांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कर्मचाऱ्यांनी वर्गणी जमा करून हा स्त्युत उपक्रम राबवला.