ST कर्मचारी तणावात,मुख्यमंत्र्यांकडे मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची सद्यःस्थिती खूप बिकट आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती योग्य राहिलेली नाही.
ST Workers News
ST Workers Newsesakal

पाचोड (जि.औरंगाबाद) : एकशे चाळीस चालक व वाहकांनी राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होऊन ते मानसिक तणावात वावरत आहेत. अन्य शासकीय कर्मचाऱ्याच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था खूपच बिकट झाल्याने व आत्महत्या करणे कायदेशीर गुन्हा असल्याने शासनाने या सर्वांना स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशा मागणी राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व तहसिलदारांना पैठण आगारातील (Paithan) कर्मचाऱ्यांनी केली आहे. याबाबत सोमवारी (ता.तीन) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,'आम्ही सध्या पैठण येथील एसटी महामंडळाच्या आगारात कार्यरत आहोत. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची (ST Worker) सद्यःस्थिती खूप बिकट आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती योग्य राहिलेली नाही. आगारात आम्ही सतत तणाव पूर्वक स्थितीत काम करित आहोत. (ST Workers Demand Euthanasia To Chief Minister Uddhav Thackeray)

ST Workers News
धनंजय मुंडेंनी मोडले कोरोनाचे नियम; ना मास्क, ना अंतर, गर्दीत काढला सेल्फी

राज्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांची स्थिती आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असून आम्हाला मिळणारे तुटपुंजे वेतन तसेच इतर प्रकारे होणाऱ्या मानसिक त्रासामुळे राज्यातील आमच्या अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या (Aurangabad) केल्या आहेत. त्याप्रमाणे आमच्याही मनामध्ये आत्महत्या करण्यासारखे विचार येतात. परंतु आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने आम्ही आत्महत्या करु शकत नाही. वारंवार निवेदने देऊनही शासकीय स्तरावर योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने आम्ही स्वेच्छा मरणाची परवानगी मागत आहोत. ही स्वेच्छा मरणाची परवानगी आम्ही स्वतः कुठल्याही दबावात न येता मागत आहोत. आम्ही आता सरकारकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीला वैतागलो आहोत.

ST Workers News
Jalna Riot : जालन्यात दंगल, एक जण गंभीर जखमी; परिस्थिती नियंत्रणात

या मानसिक व स्वेच्छा मरणाच्या मागणी करिता आमच्यावर कुणीही दबाव टाकीत नसून स्वेच्छेने आम्ही निवेदनावर स्वाक्षऱ्या करीत आहोत. मुख्यमंत्री महोदय हे राज्याचे प्रमुख या नात्याने आपण एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देण्यात येऊन आम्हाला आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्त करावे व आम्हा एसटी कर्मचाऱ्याना जिवनदान द्यावे. अन्यथा शासनस्तरावरून आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.

ST Workers News
Dhiraj Deshmukh : आमदार धीरज देशमुख यांना कोरोनाची लागण

या निवेदनावर अशोक थोरात, अनिल बाबर, सुभान पठाण, अमोल रावते, देवीदास नागरे, सचिन मुचुटे, बाबासाहेब जामदार, पोपट अकोलकर, फेरोझखान पठाण, शेख महंमद, सोमनाथ कदम, शामराव गुंडरे, चांद पठाण, शंकर परागे, गोरख चेडे, युनूस शेख, गणेश कड, नवनाथ चोथे, अमोल कांबळे, मनोहर चव्हाण, धोंडिराम चितळे, काकासाहेब बाबरे, सतीश साळवे यांच्यासह १४० वाहक व चालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com