Jalna Riot : जालन्यात दंगल, एक जण गंभीर जखमी; परिस्थिती नियंत्रणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna Riot News
Jalna Riot : जालन्यात दंगल, एक जण गंभीर जखमी; परिस्थिती नियंत्रणात

Jalna Riot : जालन्यात दंगल, एक जण गंभीर जखमी; परिस्थिती नियंत्रणात

जालना : शहरातील टांगा स्टँड येथे मंगळवारी (ता.चार) जुन्या वादातून झालेल्या मारहाणीला दंगलीचे स्वरूप प्राप्त झाले. यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणल्याने सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बाजारपेठा पुन्हा सुरू झाली आहे. शहरातील (Jalna) टांगा स्टँड येथे सकाळ दोन जणांमध्ये जुन्या कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर दंगलीत (Riot In Jalna) झाले. दोन समाजचे काही जण एकत्र येऊन हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन फिरत होते. (Riot In Jalna, One Serious Injured, Situation Under Control)

हेही वाचा: Dhiraj Deshmukh : आमदार धीरज देशमुख यांना कोरोनाची लागण

दरम्यान या मारहाणीत फरदीन शेख हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर औरंगाबाद (Aurangabad) येथील खासगी रुग्णालयात दाखल उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, पोलिस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, सदर बाजार प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक एम. ए. सय्यद, कदीम जालना पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेश टाक व इतर पोलिस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा: इथे ओमिक्राॅन नाही का? मास्क कोण घालणार : एकनाथ शिंदे

पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून बाजारपेठ पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान संशयित आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalna
loading image
go to top