जननी जन्मभूमीश्‍च : सशस्त्र क्रांतीची कथा 

photo
photo

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात जहाल आणि सशस्त्र क्रांतीकारकांच्या अनेक रोमहर्षक कथा आहेत. ब्रिटीश पोलिस, ब्रिटीश यंत्रणा यावर सशस्त्र हल्ले करणे, ब्रिटिश सरकारचा खजिना लुटणे, रेल्वे स्फोटकांनी उडवून देणे, इत्यादी कारवायांच्या या रोमहर्षक हकीकती अनेकांना विशेषतः नवतरूण पीढीस आवडणाऱ्या, देशभक्तीचे स्फुरण जागविणाऱ्याच आहेत. प्रस्तुत ‘जननी जन्मभूमिश्‍च’ हे नाटक. 

क्रांतीकारकारकाची साहसी कथा 

अशाच असंख्य ज्ञातअज्ञात सशस्त्र क्रांतीकारकांच्या साहसी कारवायांवर बेतलेले आहे. ते कुणा एका विशिष्ट क्रांतीकारकाची वा स्थळाची गोष्ट सांगणारे नाही. अशा कथानकाची संहिता ओजस्वी भाषेची असणे जसे गरजेचे आहे, तसेच त्यातील कलावंतांना त्या कथानकाचे स्पीरीट अर्थात आत्मा लक्षात घेवून तेवढ्याच त्वेषाने ते सादर करणेही आवश्‍यक असते. सुदैवाने संहिता आणि परफॉर्मन्स अशा दोन्ही स्तरावर प्रस्तूत नाटक निवडलेल्या आशय विषयाला न्याय देणारे निघाले, त्यामुळे ते रसिकांना आवडले. 

नाटकाचा आलेख उंचावला

प्रस्तुत नाटकात पुरुष क्रांतीकारकांप्रमाणेच विठाई आणि तिच्या दोन सहकारी महिला याही कशा इंग्रजी जुलमी राजवटीविरुद्ध पेटून उठल्या आणि आपले बलिदान देण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. उलट त्या याबाबतीत पुरुषांपेक्षा अधिक अग्रेसर राहिल्या, असे दाखवले आहे. स्पीरीट, त्वेष, तडफदारपणा थेट आरंभापासूनच सर्व कलावंतांनी आपापल्या कामात उत्तम राखल्याने नाटकाचा आलेख उंचावत गेला. 

तिरंगा ध्वजाचा इफेक्‍ट 

क्रांतिकारकांच्या साहसासोबतच यात तत्कालीन जमीनदार, वतनदार लोकांच्या मनाची द्विधा अवस्था, लग्न ठरलेल्या तरण्या लेकीने त्यात पडून आपल्या जीवनाची आहुती देऊ नये यासाठी तळमळणाऱ्या तिच्या बापाची मनोव्यथा, इंग्रज पोलिस दलात नोकरी करूनही छुपेपणाने क्रांतीकारकांना मदत करणारे देशी युवक, त्याचप्रमाणे बातम्या फोडणारे फितूर अशा अनेक रंगछटा मिसळल्याने नाटक पुरेसे रंजक आणि उत्कंठावर्धकही झाले. क्रांतीकारकांना यश मिळते व ते शेवटी तिरंगा फडकावतात, या दृश्‍याचे वेळची प्रकाश योजना, पार्श्‍वसंगीत, रंगमंचावरील सर्व कलावंतांच्या मुद्रा आणि नाट्यगृहाच्या आतील छतावरही प्रकाश योजनेतून तिरंगा ध्वजाचा इफेक्‍ट साधण्याची कल्पकता एक विरश्रीयुक्त वातावरण निर्माण करते. देशभक्तीच्या भावनेचा परिपोष करणारे हे नाटक नाट्यस्पर्धेत स्वतःचे वेगळेपण निश्‍चितच नोंदविते. 

नाटकाचे नाव : जननी जन्मभूमिश्‍च 
लेखक : डॉ. चंद्रकांत शिंदे 
दिग्दर्शन : नितीन नांदूरकर 
सादरकर्ते : धनश्री बहुउद्देशीय शिक्षणसंस्था, बुलढाणा 


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com