

Police investigate an alleged ₹48.15 lakh investment fraud involving a fake IPO offer in Chhatrapati Sambhajinagar.
esakal
छत्रपती संभाजीनगर,: शेअर बाजारातून भरघोस नफ्यासह नामांकित कंपनीचा आयपीओ तब्बल २२ टक्के सवलतीत मिळवून देण्याचे आमिष एकाला चांगलेच महागात पडले. त्याची तब्बल ४८ लाख १५ हजार ९९७ रुपयांची फसवणूक झाली. हा प्रकार मुकुंदवाडी भागात घडला असून याप्रकरणी रिया कपूर नावाच्या महिलेसह तिच्या साथीदारांविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल झाला.