Waqf Lands : वक्फ जमिनीवरील अतिक्रमण, बेकायदा विक्रीविरोधात कठोर कारवाई करणार; बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

Waqf  Land
Waqf Land

छत्रपती संभाजीनगर : वर्षानुवर्षे वक्फ मंडळाच्या जमीनीवरील अतिक्रमण, ताबा करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. बेकायदा विक्री व हस्तांतरण करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. वक्फ सदस्य जमिनींचा आढावा घेण्यासाठी पुढच्या आठवड्यात राज्यभर दौरा करणार असून सोलापूर पासून त्याची सुरुवात होणार असल्याची माहिती वक्फ बोर्डाचे अध्यक्ष व आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी दिली. वक्फ बोर्डाची मुंबईत बैठक झाली त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

Waqf  Land
BMC: खिशात नाही अडका अन्.. पैसे नाहीत म्हणणाऱ्या BMC ची मोदींच्या कार्यक्रमात कोट्यवधीची उधळण

बैठकीत खासदार फौजिया खान, खासदार इम्तियाज जलील, सदस्य मौलाना अथर अली, मुदसीर लांबे, हसनैन शाकेर, समीर काजी, मुख्यकार्यकारी अधिकारी मो. बा. ताशीलदार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद तसेच वक्फ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

वक्फ मंडळाची बैठक मुंबई, इस्लाम जिमखाना येथे पार पडली. यात जमिनीची देखभाल, अनागोंदी कारभार करणाऱ्या विरोधात कठोर कायदेशीर करण्याचा सर्वसंमतीने निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील अनेक जमीनीची बेकायदा खरेदी-विक्री व हस्तांतरण झाल्याचे निदर्शनास आले आहे.

कलम ५१ अन्वये वक्फ मंडळाच्या विना परवानगी शिवाय असली कोणतीही कृती बेकायदा ठरते.असे असतांना ही काही भूमाफिया असले प्रकार करत असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय कायदा १९९५ च्या कलम ५२ (ए) अन्वये दोन वर्षा पर्यंत सशक्त कारावास होऊ शकते.

Waqf  Land
Nilwande Dam: 'माझ्या जन्माच्या आधीपासून प्रकल्पाला सुरवात झाली'; निळवंडे उद्घाटनावेळी फडणवीसांचा टोला

वक्फच्या तरतुदी नुसार जमिनींच्या विकासासाठी कायदेशीर सल्लागार संस्थांची नियुक्ती करण्यास ही बैठकीत मान्यता देण्यात आली. वक्फ मंडळाने नुकतेच वक्फ फंड न भरणाऱ्या राज्यातील तब्बल १२ हजार संस्थांना नोटीस बजावल्या होत्या. या संस्थांना लेखापरीक्षण करण्यास अडचण येऊ नये म्हणून पॅनल ऑफ ऑडिडर्सची सेवा राज्यस्तरावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी ही मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती डॉ.वजाहत मिर्झा यांनी दिली.

राज्यातील संस्थांचे नोंदणीकरण प्रक्रियेस गती मिळावी म्हणून पुढच्या आठवड्यात वेब पोर्टल सुरु करण्याचा मानस असल्याचे ही डॉ.मिर्झा यांनी सांगितले.या बाबत संबंधितांची कोणतीही तक्रार येणार या साठी प्रशासनास तत्पर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.वेब पोर्टल मुळे नोंदणीकरण प्रक्रिया जलदगतीने होणार आहे.

वक्फ मंडळ तब्बल पन्नास वर्ष पासून पाणचक्की परिसरात आहे. आता स्वतःच्या इमारतीसाठी प्रयत्न केले जात आहे. छावणी परिसरात वक्फ जमिनिवर जलप्राधिकरण बोर्डाची इमारत रिकाम आहे.यासाठी मागील अनेक दिवसा पासून पाठपुरावा करण्यात येत होता.

मुख्यकार्यकारी अधिकारी मो. बा.ताशीलदार यांनी या इमारतीची पाहणी ही केली आहे. सदर इमारत हस्तांतरण करण्यासाठी राज्य शासनकडे मान्यतेस प्रस्ताव पाठविण्यास मंजुरी देण्यात आली. बैठकीत मंडळाच्या वार्षिक अंदाजपत्रक मंजुरी देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com