esakal | पतीच्या निधनानंतर जिद्दीने उभे केले आयुष्य
sakal

बोलून बातमी शोधा

सायराबानाे

पतीच्या निधनानंतर खचून न जाता दोन्ही मुलांचा सांभाळ करत वीस वर्षांपूर्वी बेसिक फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला. एक मुलगा आणि एक मुलगी यांचा सांभाळ करत स्वतःचे आयुष्य जिद्दीने उभे केले. इथेच न थांबता दोन्ही मुलांचे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. शहरातील गरजू महिला-मुलींना त्यावेळी फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी अनेक अडचणी असताना जनजागृती केली. महिला-मुलींना मोफत प्रशिक्षणासाठी घराबाहेर येण्यास प्रोत्साहित केले. आज त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतलेल्या हजारो मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. अनेकांना त्यांच्या प्रशिक्षणातून रोजगार मिळाला. ही यशकथा आहे शहरातील सायराबानो यांची.

पतीच्या निधनानंतर जिद्दीने उभे केले आयुष्य

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद-रेल्वेस्टेशन येथे राहत असताना सायराबानो यांच्या पतीचे १९९७ मध्ये निधन झाले. त्यावेळी मुलगी दहा तर मुलगा सहा वर्षांचा होता. या मानसिक धक्क्यांतून सावरण्यासाठी त्यांना किमान वर्षाचा कालावधी लागला. त्यांना स्वतःला सावरत बेसिक फॅशन डिझायनिंग कोर्स करण्याचा निर्णय घेतला. पैठणगेट येथे त्यांनी नियमित वर्ग केले. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या महिला आणि लहान मुलांच्या बुटीकमध्ये पारंगत झाल्या. रोशनगेट येथे त्यांनी महिला-मुली तसेच गरजू विधवा महिलांना प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. 

ठळक बातमी : निर्णय झाला : चिकलठाणा विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव

अनेकजण मुलींना बाहेर पाठवत नव्हते
वीस वर्षांपूर्वी मुलींना अशा प्रकारे फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण देणे खूप अवघड होते. अनेक जण तर मुलींना बाहेर पाठवायला तयार नव्हते. सायरा बानो कित्येक महिलांच्या घरी गेल्या. त्यांच्या आई-वडील, सासू-सासरे यांची समजून काढून महत्त्व पटवून दिले. हळूहळू लोकांनी त्यांच्याकडे प्रशिक्षणासाठी महिला-मुलींना पाठविण्यास सुरवात केली. प्रशिक्षणात सुई पकडण्यापासून तर सर्व प्रकारच्या ड्रेस मटेरियलपर्यंतचे प्रशिक्षण दिले. काही महिला प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या. त्यांना यातून रोजगार मिळू लागला. यातून सर्वांकडे माहिती गेल्याने अनेकांनी मग लेडीज आणि चिड्रेन्स वेअरच्या प्रशिक्षणासाठी महिला-मुलींना पाठवले. या प्रशिक्षणातून कित्येकांनी आयटीआयचे प्रमाणपत्रसुद्धा मिळविले. यानंतर सायराबानो यांनी लोटाकारंजा येथील इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणाच्या काळात महिला-मुलींनी तयार केलेले ड्रेस मटेरियल यांचे प्रदर्शन भरविले. 

हेही वाचा : थोर गणिती भास्कराचार्यांनी कुठे लिहिला लीलावती ग्रंथ...

कुटुंबाला आर्थिक हातभार 
आता कुठेही गेले तरी शिलाई महाग झाली आहे. त्यामुळे ज्यांनी याचे प्रशिक्षण घेतले त्यांचे कुटुंब या व्यवसायातून उभे राहिले आहे. घरी एक जरी शिलाई मशीन असली तरी त्यातून त्यांना आर्थिक हातभार लागतो. सध्या शिलाई मशीनचे काम करताना महिलांना चांगला रोजगार मिळत आहे. 

loading image