

Student knife attack on teacher
ESakal
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे शाळेत एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्या वर्गशिक्षकावर थेट चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टीसी घेण्यासाठी शाळेत आलेल्या विद्यार्थ्याचे एका शिक्षकासोबत वाद झाला. मात्र या शाब्दिक वादाचे रूपांतर हिंसक वळणावर गेले. संतापून विद्यार्थ्याने चाकूने शिक्षकावर हल्ला केला. या घटनेने शाळेसह परिसरात एकच खळबळ पसरली आहे.