esakal | 'शाळे'साठी विद्यार्थ्यांची चिखल,पाण्यातून जीवघेणा प्रवास |Aurangabad News
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

'शाळे'साठी विद्यार्थ्यांची चिखल,पाण्यातून जीवघेणा प्रवास

sakal_logo
By
जमील पठाण

कायगाव (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव (ता.गंगापूर) (Gangapur) येथील नजन वस्ती ते अहिल्याबाई बारव दरम्यानच्या खराब रस्त्यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांना कसरत करावी लागत आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने (Rain) रस्त्यावर सर्वत्र पाणी साचल्याने शालेय विद्यार्थ्यांना चिखल व पाण्यातून मार्ग काढत ज्ञानार्जनासाठी शाळेला जावे लागत आहे. या विषयी येथील श्रीहरी नजन यांनी गंगापूरचे तहसीलदार सतीश सोनी यांना निवेदन दिले. रस्ता (Aurangabad) जवळपास शेतवस्तीवर राहणाऱ्या २० कुटुंबांसाठी महत्त्वाचा असून अतिवृष्टीमुळे रस्त्यावर सतत पाणी वाहत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांना खूप अडचणी येत आहेत. शाळा येथून तीन किलोमीटर अंतरावर असून पायी जाताना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. सध्याच्या पाणी व चिखलातून वाट काढत जावे लागते. चिखलात पाय फसतात, काटे रुततात.

हेही वाचा: भोंदू बाबाचे पितळ उघड, दैवी प्रकोपाची भीती दाखवून लाटले २३ लाख

अनेकदा पाय घरून मुले पडतात. यात अनेकदा मुलांचे वह्या-पुस्तके, दप्तर आदी चिखलात खराब होतात. तसेच शेतीचे माल बाजारात नेण्यासाठी खूप त्रास होत आहे. दोन ओढ्यांचे पाणी या रस्त्यावर येत असल्याने ही अडचण होत असल्याचे त्यांनी सांगितले. तत्काळ चांगला रस्ता करून घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

loading image
go to top