Medical Research: सबवास्टस पद्धतीने गुडघा प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया; डॉ. मारुती लिंगायत यांच्या नेतृत्वात संशोधन
Subvastus knee replacement: सबवास्टस पद्धतीने केलेल्या गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत स्नायू न कापता ऑपरेशन केले जाते. या पद्धतीत रुग्णांची रिकव्हरी जलद गतीने होत असल्याचे घाटी रुग्णालयाच्या संशोधनातून निष्पन्न झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर : सबवास्टस पद्धतीने केलेल्या गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया थोडीशी वेळखाऊ आणि कौशल्य पणाला लावणारी आहे. त्यातून रुग्णाची रिकव्हरी जलद गतीने होत असल्याचे संशोधनातून समोर आले.