लिंबाच्या बागेतून दोन लाखांचे उत्पादन

करमाड येथील शेतकरी सय्यद रौफदादा यांचा यशस्वी प्रयोग
Lemon
LemonSakal
Updated on

भरमसाट खर्च करून उत्पादन घेतले तरी त्याला भाव मिळत नाही. पर्यायाने शेतकरी सतत अडचणीत असतो, अशी ओरड नेहमीच ऐकायला मिळते. मात्र, जे शेतकरी शेतीला व्यावसायिक दृष्टीने पाहतात, त्यांना ती परवडणारी ठरते. करमाड (ता. छत्रपती संभाजीनगर ) येथील शेतकरी सय्यद रोफदादा सय्यद मुन्शी यांनी प्रयोगशीलता जपत शेतात लिंबाच्या झाडांची लागवड केली. कमी खर्चात जास्त उत्पादन व नफा मिळत असल्याने ही लिंबाची बाग त्यांना फायदेशीर ठरत आहे.

सय्यद रोफदादा सय्यद मुन्शी यांच्याकडे एकूण पाच एकर जमिन आहे. पैकी अडीच एकर बागायती क्षेत्र आहे. त्यापैकी लिंबाची एक एकर क्षेत्रावर १२० झाडे आहेत. उर्वरीत क्षेत्रावर ते खरीप, रब्बी हंगामातील पिके घेतात. लिंबू बागेतून उत्पादन बारमाही असते. त्यामुळे लिंबाच्या फळबागेतून दोन लाखांचे उत्पादन घेतले. सरासरी ७० रुपये प्रतिकिलो दर मिळाला.

Lemon
संभाजीनगरात दररोज २०० टन ‘बासमती’ होतो फस्त!

लिंबाला उन्हाळ्यात तसेच लग्नसराईत मोठी मागणी असते. शिवाय वर्षभर उत्पादनही मिळते. त्यामुळे कमी खर्चात अधिक फायदा देणारी लिंबाची फळबाग आहे.

- सय्यद रोफदादा, शेतकरी, करमाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com