esakal | Farmer Protest: दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानीचे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

farmer protest

शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानीचे आंदोलन

sakal_logo
By
- प्रकाश बनकर

औरंगाबाद: केंद्र सरकारने केलेल्या तीन कायद्याच्या (three agriculture bills 2020) विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. यानिमित्त आज देशभरात काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. याचे औचित्य साधून सुभेदारी विश्रामगृहावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे काळ्या फिती बांधून (black day by farmers) केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवतीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात 'तीन काळे कायदे रद्द करा,' 'मोदी हटाव, देश बचाव' 'केंद्र सरकार. हाय हाय', 'स्वामीनाथन आयोग लागू झालाच पाहिजे' अशा विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.

हेही वाचा: Buddha Jayanti 2021: पिंपळाच्या पानावर साकारली गौतम बुद्धांची रांगोळी

गेल्या सहा महिन्यापासून सुरू असलेल्या आंदोलनास केंद्र सरकारने चिरडण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकरी डगमगला नाही हे आंदोलन पुन्हा असेच सुरू राहील व पुन्हा मोठ्या ताकतीने ते आंदोलन करु असेही पूजा मोरे यांनी सांगितले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला