Police seize intoxicating syrup worth ₹16 lakh during a raid in Latur; medical store owner arrested.

Police seize intoxicating syrup worth ₹16 lakh during a raid in Latur; medical store owner arrested.

Sakal

सोळा लाखांचे सिरप जप्त; ‘मराठवाडा मेडिकल’च्या मालकाला अटक, छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांची लातूरला कारवाई!

Chhatrapati Sambhajinagar police action in Latur: लातूरमध्ये नशेच्या सिरपचा मोठा साठा जप्त, मराठवाडा मेडिकलचा मालक अटकेत
Published on

छत्रपती संभाजीनगर: शहर गुन्हे शाखा पोलिसांनी लातूरहून अवैधरीत्या शहरात आलेला १२ लाख ४८ हजार रुपये किमतीचा नशेच्या सिरपचा साठा जप्त करत तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. या प्रकरणात हा साठा ज्या मराठवाडा मेडिकलमधून आला त्या मेडिकल चालक, मालकाविरोधात सिटी चौक पोलिसांत गुन्हाही दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे शाखेचे एक पथक २५ जानेवारीला मेडिकल मालकाच्या शोधात रवाना झाले होते. दरम्यान, मालकाला बेड्या ठोकत, तब्बल १६ लाख ३२ हजार रुपयांचा सिरपचा साठा जप्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com