Jalna News : बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करा : आमदार टोपे

डॉक्टर व स्टाफवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी आमदार राजेश टोपे यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनात केली.
jalna
jalnasakal

अंबड : बोगस डॉक्टरांवर शासनाने कठोर कारवाई करावी. डॉक्टर व स्टाफवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी आमदार राजेश टोपे यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनात केली.

माकडांकडून फळपिकांसह शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच नागरिकांच्या घरांचे देखील नुकसान होत आहे. शासनाने माकडे व वानरे पकडण्यासंदर्भातील शासन निर्णय रद्द केलेला आहे. शासनाने तो निर्णय पूर्ववत करावा. राज्यात बंगालचे आणि बिहारचे वैद्यकीय ज्ञान नसणारे पण डॉक्टरची पाटी लावणारे बोगस डॉक्टर मोठ्या प्रमाणात कार्यान्वित आहेत.

हे लोक ग्रामीण व दुर्गम भागात दवाखाने सर्रास थाटत असून, ग्रामीण भागात लॅब चालवण्याची परवानगी नसताना देखील लॅब चालवित आहेत. अनेक रुग्णांना कॅन्सरसह अनेक दुर्धर आजार असल्याचा बोगस रिपोर्ट देत भोळ्या, अज्ञानी व निरक्षर लोकांचा ते फायदा घेत आहेत. राज्यातील बोगस डॉक्टरांवर शासनाने कारवाई करावी.

राज्यातील अनेक भागांत डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत असून रुग्णांचे नातेवाईक डॉक्टर किंवा स्टाफला मारहाण करतात. धाक दाखवतात. हॉस्पिटलची तोडफोड करतात. असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. कायदा हातात घेतला जात आहे. हल्ला करणाऱ्यांसाठी सरकारने कायदा केलेला असून हल्ला करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल होत नाही. याबाबत शासनाने त्वरित लक्ष घालावे अशी मागणी देखील आमदार टोपे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com