Tata Power: औसा परिसरात होतेय शंभर मेगावॉट वीजनिर्मिती ;टाटा पॉवरचा पवन ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित, दरवर्षी २.५२ लाख टन कार्बन उत्सर्जन होणार कमी

Tata Power Renewable Energy : लातूर जिल्ह्यातील औसा येथे टाटा पॉवरने १००.८ मेगावॉट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. यातून दरवर्षी ३०.८ कोटी युनिट हरित वीजनिर्मिती होणार असून कार्बन उत्सर्जनातही घट अपेक्षित आहे.
Tata Power has commissioned a 100.8 MW wind energy project at Ausa in Latur district.

Tata Power has commissioned a 100.8 MW wind energy project at Ausa in Latur district.

esakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर,: टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने (टीपीआरईएल) लातूर जिल्ह्यातील औसा येथे १००.८ मेगावॉट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. यातून निर्माण होणारी वीज टाटा पॉवरच्या मुंबई वितरण विभागाला म्हणजेच टीपीसीडी या युनिटला पुरविण्यात येणार आहे. या प्रकल्पातून दरवर्षी ३०८ दशलक्ष युनिट अर्थात ३०.८ कोटी युनिट स्वच्छ हरित वीजनिर्मिती अपेक्षित आहे. त्यामुळे दरवर्षी दोन लाख ५२ हजार ५६० टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी होण्याचा अंदाज कंपनीने वर्तविला.

Loading content, please wait...