पालकांच्या तक्रारीनंतर आडूळच्या शाळेत थम्ब मशीन; उशिरा व सतत दांड्या मारणाऱ्या शिक्षकांसाठी निर्णय

जिल्हा परिषदेच्या शाळेत काही शिक्षक उशिरा व सतत दांड्या मारतात, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालकांच्या तक्रारी होत्या.
teachers attendance thumb machine install in adool gram panchayat school
teachers attendance thumb machine install in adool gram panchayat schoolSakal

आडूळ : येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत काही शिक्षक उशिरा व सतत दांड्या मारतात, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे आडूळ बु. ग्रामपंचायतीने सर्व शिक्षकांची दैनंदिन उपस्थिती नोंदविण्यासाठी येथील जिल्हा परिषद प्रशालेत स्मार्टनेस थम्ब मशीन मंगळवारी (ता. १२) बसवण्यात आले.

ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशालेत थम्प मशिन बसविण्यात आलेली ही पहिलीच शाळा असल्याचा दावा, येथील ग्रामस्थांनी केला आहे. येथील ग्रामपंचायत सदस्य द्वारकानारायण पिवळ यांनी स्वखर्चाने हे थम्ब मशीन शाळेसाठी मोफत दिले आहेत. त्याचे उद्‍घाटन सरपंच बबन भावले यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १२) सकाळी ११ वाजता करण्यात आले.

या ठिकाणी इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वीपर्यंत वर्ग असून ५२७ विद्यार्थी शिक्षण घेतात. आता यापुढे कोणते शिक्षक उशिरा आले? कोण लवकर घरी गेला? किंवा कोणत्या शिक्षकाने शाळेला विना परवानगी दांडी मारली याची सर्व माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय तसेच शालेय व्यवस्थापन समितीला कळणार आहे.

ग्रामसभेत घेतलेल्या या चांगल्या सार्वजनिक निर्णयाचे पालकांनी स्वागत केले आहे. याप्रसंगी सरपंच बबन भावले, उपसरपंच शेख जाहेर, युवासेनेचे जिल्हा प्रमुख शुभम पिवळ, माजी उपसरपंच विजय वाघ, सोसायटीचे माजी चेअरमन शेख जब्बार,

माजी ग्रा. पं. सदस्य राजेंद्र वाघ, रुस्तुम बनकर, मोहसिन तांबोळी, हारुण पठाण, रामू पिवळ, अलका बनकर, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सुधीर भालेराव, खुशाल राठोड, मुख्याध्यापिका ज्योती मादनकर, ग्रामविकास अधिकारी अशोक आहेर, रतन चव्हाण आदींसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१४ शिक्षकांना बायोमेट्रिकद्वारे हजेरी नोंदविणे अनिवार्य

मंगळवारी मुख्याध्यापकांच्या दालनात ही थम्ब मशिन बसविण्यात आली असून उद्या बुधवारी (ता. १३) सकाळपासून प्रशालेतील एकूण १४ शिक्षकांना बायोमेट्रिक प्रणालीद्वारे हजेरी नोंदविणे अनिवार्य केले आहे.

आडूळ बु. येथील शाळेत काही शिक्षक उशिरा येतात, दांड्या मारतात या संदर्भात पालकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची ग्रामसभेत दखल घेऊन प्रथम बायोमेट्रिक मशीन बसवण्याचा निर्णय घेतला. यापुढे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, अंगणवाडी तसेच खासगी शाळेतसुद्धा बायोमेट्रिक मशीन बसविण्यात येणार आहे.

— बबन भावले, सरपंच.

ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागतच केले आहे. बुधवारपासून शाळेतील सर्वच शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी काटेकोरपणे नोंदविली जाईल याची काळजी घेऊ.

— ज्योती मादनकर, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद प्रशाला आडूळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com