
Exam Center
sakal
छत्रपती संभाजीनगर : दहावी-बारावी परीक्षेच्या काळातील गैरप्रकारावर अखेर न्यायालयाने पोलिसांना थेट फटकारले. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. परंतु, एकावरच गुन्हा नोंदवित इतरांना मात्र अभय देण्यात आल्याचा प्रकार समोर आला. चंद्रकांत सोपानराव चव्हाण (रा. मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे.