
छत्रपती संभाजीनगर : शालेय शिक्षण विभागाने वर्ष २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील पायाभूत चाचणी (पॅट-१) घेण्याची तयारी केली. पण, याला शिक्षकांकडून विरोध होत आहे. अद्याप अनेक शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, विद्यार्थ्यांचे दाखले अद्याप पोचलेले नाहीत, तरीही शिक्षण विभागाने ‘सेमी इंग्रजी’ माध्यमातील विद्यार्थ्यांची अचूक संख्या पाठविण्याचे आदेश शाळांना दिले. यामुळे शिक्षक संभ्रमात आहेत.