Chhatrapati Sambhajinagar News : टेम्पो अंगावर घातल्याने पोलिसांकडून गोळीबार; एक कर्मचारी गंभीर

जळगाव बायपास रस्त्याने केंब्रिज चौकाच्या दिशेने भरधाव वेगात एक संशयित टेम्पो येत असल्याची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी अलर्ट झाले.
Crime
CrimeSakal

Chh. Sambhaji Nagar Crime News - जळगाव बायपास रस्त्याने केंब्रिज चौकाच्या दिशेने भरधाव वेगात एक संशयित टेम्पो येत असल्याची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी अलर्ट झाले. मात्र, पोलिसांना पाहूनही चालकाने आणखीनच वेग वाढवला. थांबविण्याचा इशारा करूनही न थांबता चालकाने थेट पोलिसांच्या अंगावर टेम्पो घातला. त्यामुळे पाठलाग करताना पोलिसांना गोळीबार करावा लागला. ही घटना रविवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास झाल्टा फाटाजवळ घडली.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक सतीश वाघ यांनी सांगितले, की एक संशयित टेम्पो भरधाव वेगात इतर वाहनधारकांना हूल देत केंब्रिज चौकमार्गे झाल्टा फाट्याच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन श्री. वाघ यांनी पथकासह धाव घेतली असता, संशयित टेम्पो भरधाव वेगात येत असल्याचे दिसले.

श्री. वाघ यांच्यासह उपनिरीक्षक मधुकर मोरे, कर्मचारी घुगे, श्री. तिडके, श्री. ढवळे, श्री. खंदारे, श्री. सोनवणे यांनी टेम्पो थांबविण्याचा इशारा केला असता, पोलिसांना पाहून वाहनाचा आणखीनच वेग वाढला. कर्मचारी अंगद तिडके यांनी रस्त्यावर येत टेम्पो थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने थेट त्यांच्या अंगावर टेम्पो घातला. यात तिडके यांच्या खांद्या, हाताला, डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. दरम्यान दोन कर्मचाऱ्यांना त्यांना घाटीत हलविले तर इतरांनी टेम्पोचा पाठलाग सुरू केला.

अशी केली अटक

१) पोलिस आपला पाठलाग करत असल्याचे दिसताच आरोपीने टेम्पोचा वेग वाढवून निपाणी गावात घातला आणि टाकळी रस्त्याने घेतला. पोलिसांनी दुसऱ्या रस्त्याने जाऊन टाकळी रेल्वे पुलाखाली जाऊन टेम्पो थांबविण्याचा प्रयत्न केला. तिथेही पोलिसांच्या अंगावर टेम्पो नेला. मात्र, पोलिस बाजूला सरकले आणि पुन्हा पाठलाग सुरू केला.

२) काही वेळातच अतिशय धोकादायक पद्धतीने वेगात टेम्पो चालवित असल्याने इतर वाहनधारक, नागरिकांच्या जिवाला धोका असल्याचे लक्षात घेत तीन किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी टेम्पोवर दोन राऊंड फायर केले. त्यावर चालकाने टेम्पो थांबवून पळ काढला तर इतर दोघांना एलसीबीच्या पथकाने बेड्या ठोकल्या.

३) गौसखाँ अब्दूलखॉँ पठाण (५०, रा. आडगाव) आणि शेख सलमान शेख कैसर (२०, रा. हर्सूल) अशी अटकेतील आरोपींची नावे असून समीर शेख हा फरार झाला आहे. आरोपींविरोधात उपनिरीक्षक मोरे यांच्या फिर्यादीवरुन चिकलठाणा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

यांनी केली कामगिरी

पोलिसांनी टेम्पो (क्र. एमएच २० डीई ६२२३) ताब्यात घेतला आहे. आरोपींनी टेम्पो सिल्लोडहून चोरून आणल्याचे समोर आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर अधीक्षख सुनील लांजेवार, डीवायएसपी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी निरीक्षक सतीश वाघ, चिकलठाणा निरीक्षक रविंद्र खांडेकर, उपनिरीक्षक मधूकर मोरे, संतोष पाटील, संजय घुरे, सचिन ढवळे, संजय घुगे, गणेश सोनवणे, नरेंद्र खंदारे, योगेश तरमाळे यांनी केली.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com