Sambhaji Nagar News : सिल्लोड तालुक्यात नव्याने रुजू होणार दहा तलाठी ; सात जणांनी घेतला पदभार

सिल्लोड तालुक्यात नव्याने हजर होणाऱ्या दहा तलाठ्यांमुळे दहा गावांचा अतिरिक्त पदभार असलेल्या तलाठ्यांच्या कामांचा ताण हलका होणार आहे.नव्याने हजर होणाऱ्या दहा तलाठ्यांपैकी सात तलाठ्यांनी पदभार स्वीकारला असून, अद्याप तीन तलाठी हजर झालेले नाहीत. काही महिन्यांपूर्वी सरळ सेवा पद्धतीने तलाठ्यांची राज्यभर भरती करण्यात आली.
Sambhaji Nagar News
Sambhaji Nagar Newssakal

सिल्लोड : सिल्लोड तालुक्यात नव्याने हजर होणाऱ्या दहा तलाठ्यांमुळे दहा गावांचा अतिरिक्त पदभार असलेल्या तलाठ्यांच्या कामांचा ताण हलका होणार आहे.नव्याने हजर होणाऱ्या दहा तलाठ्यांपैकी सात तलाठ्यांनी पदभार स्वीकारला असून, अद्याप तीन तलाठी हजर झालेले नाहीत. काही महिन्यांपूर्वी सरळ सेवा पद्धतीने तलाठ्यांची राज्यभर भरती करण्यात आली. यामुळे महसूल विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या जागांवर कर्मचारी रूजू होणार असल्याने अनेक गावांचा अतिरिक्त पदभार असलेल्या तलाठ्यांनादेखील कामे उरकण्यास वेळ लागत होता.

या सजांना मिळाले तलाठी

तालुक्यातील अतिरिक्त कारभार असलेल्या भराडी, नानेगाव, पिंपळदरी, नाटवी, वसई-जळकी, आमसरी, लोणवाडी, बोरगाव कासारी, बाभूळगाव व शिवणा उत्तर या सजांसाठी नवीन तलाठ्यांची नियुक्ती झाली आहे.

तालुक्यात एकूण ६४ तलाठी सजा

सिल्लोड तालुक्यात एकूण ६४ तलाठी सजा असून, तालुक्यात केवळ ३९ तलाठी कार्यरत आहेत. त्यामुळे २५ तलाठी सजांचा अतिरिक्त कारभार आहे, त्या तलाठ्यांना विभागून देण्यात आले आहे.

Sambhaji Nagar News
Sambhaji Nagar News : विकास आराखड्यामध्ये कागदपत्रांचा ‘झोल’

आता नव्याने सिल्लोड तालुक्यात दहा तलाठ्यांची वर्णी लागली असून यातील सात तलाठी तहसील कार्यालयात हजर होऊन त्यांनी त्यांच्या तलाठी सजेचा कारभार हाती घेतला आहे. त्यामुळे अनेक सजांचा कारभार एकाच तलाठ्याच्या हाती रहात असल्याने अनेक वेळा सामान्य नागरिकांची कामे खोळंबण्याचे प्रकार सातत्याने होत होते. त्याला आता थोड्याफार प्रमाणात का होईना आळा बसून, आता केवळ वीस तलाठी सजांचा अतिरिक्त कारभार तलाठ्यांच्या हाती असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com