
छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील उच्च न्यायालयाच्या लगत असलेल्या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाची भव्य प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. यासाठी पीडब्ल्यूडी विभागातर्फे ६२ कोटींची निविदाही प्रकाशित केली. परंतु, हे काम मर्जीतील कंत्राटदाराला मिळावे म्हणून ई-निविदेच्या प्रक्रियेला छेद देत टेंडर प्रक्रियेमध्ये रिंग होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.