Sambhaji Nagar : पैठण नगरपालिकेवर प्रशासकराजच कायम राहणार?

लोकसभेच्या हालचाली सुरू: स्थानिक निवडणुका लांबणीवरच
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

पैठण : येथील पैठण नगरपालिकेच्या २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीला सात वर्षे पूर्ण झाली आहेत तसेच तत्कालीन नगराध्यक्ष व नगरसेवकांचा कार्यकाळ संपून दोन वर्षे पूर्ण झाली. सध्या प्रशासकांचे तिसरे वर्ष सुरु आहे. सात वर्षांत शहरातील राजकारणामध्ये बदल झाला आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पालिकेवर प्रशासकराजच कायम राहणार असेच संकेत मिळत आहेत.

पैठण नगरपालिकेची निवडणूक २०१६ मध्ये झाली होती. त्यात म्हणावा तसा पैठण शहरात भाजप पक्ष प्रभावी नसताना भाजपने थेट जनतेतून असलेली नगराध्यक्ष पदांची निवडणूक जिंकली व नगराध्यक्ष पदी सूरज लोळगे हे विराजमान झाले होते. या निवडणुकीत बलाढ्य पक्ष असणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन ही पक्षातील आमदार संदीपान भुमरे (शिवसेना), माजी मंत्री अनिल पटेल(काँग्रेस) व माजी आमदार संजय वाघचौरे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनाही निवडणूक जिंकता आली नाही.

परंतु भाजपने मात्र, ही नगर पालिकेची नगराध्यक्ष पदांची निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकून प्रभाव पाडला. दोन वर्षांपूर्वी नगर पालिकेतील नगराध्यक्ष व‌ नगरसेवकांची मुदत संपल्यामुळे प्रशासकराज आला आहे. दरम्यान, राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे भाजपचे राज्यात सरकार आले. ‌त्यामुळे भाजप पुन्हा नगर पालिका जिंकून ताब्यात घेणार अशी चर्चा सुरु झाली. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवरच पडल्याने या निवडणुकीची चर्चाच राहिली.

sambhaji nagar
Sambhaji Nagar : वैजापुरात जमिनीतून अवैध उत्खनन ; वैजापुरात ३९ जणांना बजावल्या कारणे दाखवा नोटिसा

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीवर प्रशासनाने अधिक भर दिला असून बीएलओंना विविध प्रशिक्षण दिली जात आहेत. ईव्हीएम मशिनद्वारे मतदान जागृती मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकते, असे संकेत आहे. लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकाही होतील. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे.

मुदत संपूनही नगरपालिका निवडणुका प्रथमच दीर्घकाळ लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे प्रशासकांची कारकीर्दही प्रथमच एवढी जास्त दिवस राहिली. याचा परिणाम विकास कामांवरही होत आहे.

— सूरज लोळगे,

माजी नगराध्यक्ष, पैठण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com