Sambhaji Nagar : बसचालकास मारहाण करत तिकिटाचे पैसे लांबविले

चालकाने बस बंद करून संबंधित व्यक्तीस बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता ती व्यक्ती दारू पिलेली होती.
sambhaji nagar
sambhaji nagarsakal

सिल्लोड : सिल्लोड येथून अंभईकडे जाणाऱ्या बससमोर उभा राहून बसचालकास मारहाण केल्याची घटना सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावर गुरुवारी (ता.२८) सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. यासोबतच वाहकाजवळील तिकिटाचे पैसे घेऊन तिघे जण पळून गेले. याप्रकरणी सिल्लोड शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिल्लोड आगाराची सिल्लोड ते अंभई बस (क्र.एमएच.१४-बीटी-१८१२) घेऊन चालक दिनकर दांडगे निघाले असता शहरातील मुख्य रस्त्यावरील एकतानगरच्या गल्लीसमोर एक जण बसच्या समोर उभा राहिला. चालकाने बस बंद करून संबंधित व्यक्तीस बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता ती व्यक्ती दारू पिलेली होती. त्यामुळे त्याचा तोल जाऊन तो खाली पडला.

sambhaji nagar
Sambhaji Nagar : एकतीस हजार बालके आहारापासून वंचित

हे बघून एकतानगर येथील तीन मुले त्याठिकाणी आली व त्यांनी बसचालकास मारहाण करण्यास सुरूवात केली. भांडण सोडविण्यासाठी बस वाहक तसेच बसमधील प्रवासी गेले असता त्यांनाही तिघांनी लोटालाटी केली. व वाहकाजवळील तिकिटांचे पैसे घेऊन तिघे जण पळून गेले.

त्यानंतर चालकास त्या मुलांची नावे कळाल्यानंतर चालकाने सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीसह पैसे घेऊन पळून जाणारे संशयित आरोपी अक्रम शहा, भुऱ्या शहा व सोहिल शहा सर्व (रा.एकतानगर, सिल्लोड) यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com