Sambhaji Nagar : कार मालकाने ड्रायव्हरला सिगारेट आणण्यासाठी पाठवले आणि चोरट्याने कारची काच फोडून २० लाखांची बॅग लंपास

या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर : कार मालकाने ड्रायव्हरला सिगारेट आणण्यासाठी पाठवले आणि हीच संधी साधत चोरट्याने अवघ्या काही मिनिटांत कारची काच फोडून २० लाखांची बॅग लंपास केल्याची घटना सोमवारी (ता. १५) दुपारी एन- ५ भागातील सह्याद्रीनगर येथे घडली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गणेश भगीरथ सोनी (वय ३९, रा. एन- ५, सह्याद्रीनगर) यांनी तक्रार दाखल केली. सोनी यांना ढोरकीन येथे कापसाच्या पैशांचे वाटप करायचे होते. यासाठी त्यांनी १५ जानेवारीला कॅनॉट प्लेस येथील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेतून १३ लाख रुपये काढले,

यानंतर त्यांनी एन- ५ भागातीलच एचडीएफसी बँकेच्या शाखेतून सात लाख रुपये काढले. ही रक्कम त्यांनी एका बॅगेत ठेवली. यानंतर चालक जगन्नाथ चौधरी आणि सोनी हे एन- ५ भागातील घरी आले. सोनी यांनी पैशांची बॅग कारमध्येच ठेवली आणि वडीलांना कारजवळ थांबण्याचे सांगत जेवणासाठी घरात गेले.

यावेळी सोनी यांच्या वडिलांनी चालक चौधरी याला समोरच्या दुकानात सिगारेट आणण्यासाठी पाठवले. चालक चौधरी सिगारेट घेऊन परत आल्यानंतर पाण्याची बाटली घेण्यासाठी कारपाशी गेले. यावेळी त्यांना कारची पाठीमागची काच फुटलेली तसेच कारमधील वीस लाख रुपये असलेली बॅग जागेवर नसल्याचे दिसून आले.

या प्रकरणी सोनी यांच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पीएसआय अमोल म्हस्के करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com