Sambhaji Nagar News : चोरीची हौस भागवली चॉकलेटवर!

समर्थनगर भागात धूमाकूळ : भल्या पहाटे पोलिस आयुक्तांची तक्रारदाराला मदत बॅंकेसह दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न, पण चोरट्यांच्या हाती लागली मूठभर चिल्लर
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर : समर्थनगर भागात चोरट्यांनी सोमवारी भल्या पहाटे धूमाकूळ घातला. सुरवातीला त्यांचे ‘लक्ष्य’ होते बॅंक. पण बॅंकेचे शटर वाकविल्यानंतर मागेच उंच ओटा असल्याने चोरट्यांचे इप्सित काही साध्य झाले नाही. मग चोरट्यांनी मोर्चा वळविला तो मेडीकल दुकानाकडे. पण शोधाशोध करूनही रोख सापडली नाही. मूठभर चिल्लर मात्र हाती लागली. बाजूलाच चॉकलेटचा बॉक्स होता. त्यातलेच काही चॉकलेट खाऊन आणि कोल्ड्रिंक्स पिऊन चोरट्यांनी चोरीची हौस भागविली!

समर्थनगरात प्रवीण आनंदगावकर यांचे आनंदधाम मेडीकल स्टोअर्स आहे. तोंडाला कापड बांधलेल्या दोन चोरट्यांनी सोमवारी पहाटे सुमारे चारच्या सुमारास आनंदगावकर यांच्या मेडीकलचे शटर उचकटवत आतमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी ड्रॉवर शोधले, पाच हजारांची कॅश असलेले ड्रॉवर चोरट्यांना सापडले नाही. दुसऱ्या ड्रॉवरमधील चिल्लर नाणी घेऊन चोरटे पसार झाले. त्यापूर्वी चोरट्यांनी बाजूलाच असलेल्या युको बँकेचे शटर वाकवून आत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाकवलेल्या शटरमागे उंच ओटा असल्याने हा प्रयत्न देखील फसला. तिसरा प्रयत्न चोरट्यांनी बँकेच्या खाली असलेल्या डोळ्यांच्या हॉस्पीटलमध्ये केला. मात्र, चोरट्यांचा हा देखील प्रयत्न फसला. या प्रकरणी आनंदगावकर यांच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

sambhaji nagar
Sambhaji Nagar News : पाचोडचा पशुवैद्यकीय दवाखाना नावालाच

सकाळी फिरण्यासाठी जात असलेल्या आनंदगावकर यांच्या परिचिताने आनंदधाम मेडीकल फोडल्याचा प्रकार पाहिला. त्यांनी आनंदगावकर यांना हा प्रकार तत्काळ कळवला. त्यांनी तातडीने दुकान गाठत चोरीची खात्री केली. तक्रार देण्यासाठी ते क्रांती चौक पोलीस ठाण्यात पोचले. यावेळी समोर दर्शनी भागात कोणी कर्मचारी नसल्याने आनंदगावकर बराच वेळ थांबले.

अखेर त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर असलेल्या फलकावरील क्रमांकावर कॉल केला. हा कॉल थेट पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांना लागला. आयुक्त लोहिया यांनीदेखील शांततेने आनंदगावकर यांचे म्हणणे एकूण घेतले. त्यांना ११२ क्रमांकावर कॉल करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर अवघ्या काही वेळातच मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

...अन् आयुक्त लोहियांनी उचलला कॉल

वरिष्ठ पोलीस अधिकारी सहसा सामान्यांचे कॉल उचलत नाहीत, असा सर्वसाधारण अनुभव आहे. त्यातही भल्या पहाटे साडेपाच वाजेची वेळ असेल तर मग अशक्य बाब आहे. मात्र, शहराचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया याला अपवाद ठरले. समर्थनगर भागात सोमवारी पहाटे चार वाजता चोरट्यांनी बँकेसहीत तीन दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. भांबावलेला तक्रारदार क्रांती चौक पोलीस ठाण्यात गेला खरा पण ठाण्यात दर्शनी भागात कोणी नसल्याचे पाहून समोरील बोर्डवरील क्रमांक घेत त्याने कॉल केला. हा कॉल चक्क पोलीस आयुक्तांना लागला. आयुक्त लोहीया यांनी या तक्रारदाराला धीर दिला आणि तात्काळ मदत मिळवून दिली.

चॉकलेट प्लस कोल्ड्रिंक्स

चोरट्यांना या चोरीत काहीच हाती लागले नाही. यामुळे चोरट्यांनी मेडीकल दुकानातील कॅडबरी तसेच इतर चॉकलेट असलेला बॉक्स उघडला. आतमधील चॉकलेट तसेच फ्रिजमधील कोल्ड्रींक पिऊन चोरट्यांनी पोबारा केला!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com