Sambhaji Nagar News ; वाहनचालक संतप्त, अपघात प्रकरणात दहा वर्षांच्या शिक्षेचा विचार

वाहनचालक संतप्त झाला असून, केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी चक्काजाम आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे.
sambhaji nagar
sambhaji nagarsakal

छत्रपती संभाजीनगर : अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्ताला जर रुग्णालयात पोचवले नाही तर चालकाला दहा वर्षांची शिक्षा आणि दहा लाखांच्या दंडाची तरतूद करणारे विधेयक लोकसभेत मंजूर झाले. याविरोधात वाहनचालक संतप्त झाला असून, केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी चक्काजाम आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने अपघातग्रस्त वाहनचालकाच्या विरोधात नवीन कायदा लागू करण्याचे ठरवले आहे. यामध्ये अपघाताचे दोन भाग करण्यात आले. चुकीने अपघात झालाच तर अपघातग्रस्ताला रुग्णालयात किंवा पोलिस ठाण्यात नेणे बंधनकारक आहे.

अपघातग्रस्ताला जागेवर सोडून पळ काढला तर हीट ॲण्ड रन म्हणून चालकाला तब्बल दहा वर्षांच्या शिक्षेसह दहा लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा जाहीर केली. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्याने चालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. ऑल इंडिया मोटार काँग्रेस, महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनांसह विविध संघटनांनी चक्का जाम करण्याची तयारी सुरू केली. याबाबत रविवारी (ता.३१) निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com