Sambhaji Nagar News : महापालिकेने कंत्राटदारअनुभवाची अट केली एका वर्षाने शिथिल

कंत्राटदाराला सहा वर्षांचा अनुभव आवश्‍यक होता. पण, एकही निविदाधारक पात्र ठरला नसल्याने फेरनिविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात आता पाच वर्षांची अट टाकण्यात आली आहे.
sambhaji nagar
sambhaji nagar Sakal

छत्रपती संभाजीनगर : नारेगाव, चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल, कांचनवाडी भागात अनेक वर्षांपासून पडून असलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंग पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने ६६ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यात कंत्राटदाराला सहा वर्षांचा अनुभव आवश्‍यक होता. पण, एकही निविदाधारक पात्र ठरला नसल्याने फेरनिविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात आता पाच वर्षांची अट टाकण्यात आली आहे.

शहरात २०१७ मध्ये कचरा कोंडी निर्माण झाली होती. त्यावेळी नारेगाव कचराडेपोवर येणारा कचरा ग्रामस्थांनी रोखून धरला होता. त्यानंतर राज्य शासनाने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी १४७ कोटींचा निधी महापालिकेला दिला.

दरम्यान, महापालिने कचरा प्रक्रिया प्रकल्पांसाठी हर्सूल, पडेगाव, चिकलठाणा, कांचनवाडी येथील जागा निश्‍चित केल्या. या ठिकाणी शहरातील कचरा टाकण्यात आला. त्यावर प्रक्रिया झालेली नाही; तसेच नारेगाव येथील कचरा डेपोतील लाखो मेट्रीक टन कचरा अद्याप तसाच पडून आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ६६ कोटींचा निधी शासनाकडून मिळणार आहे. त्यानुसार महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेत संबधित कंत्राटदाराला किमान सहा वर्षांचा अनुभव असावा, अशी अट होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com