Sambhaji Nagar News : संक्रांतीनिमित्त वाळूज बाजारपेठ बहरली

वाळूजच्या नगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर गर्दी केली होती. तर सराफ बाजारही ग्राहकांनी फुलून गेला होता.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

वाळूज, ता. १४ (बातमीदार) : मकरसंक्रांतीला अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या सुगडी व वाणाचे साहित्य खरेदीसाठी महिलांनी वाळूजच्या नगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर गर्दी केली होती. तर सराफ बाजारही ग्राहकांनी फुलून गेला होता.

मकरसंक्रांत सोमवारी आहे. या सणाला मातीचे सुगडे, तीळ व विविध फळे, गव्हाच्या ओंब्या, ज्वारीची कणसे, ऊस आदींनी युक्त अशा वाणाला महत्त्व आहे. येथील नगर -छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सुगडी व वाणाच्या साहित्याची दुकाने थाटली होती. या साहित्यांच्या खरेदीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत महिलांची खरेदी सुरू होती.

सराफ बाजारही महिला ग्राहकांनी फुलून गेला होता. एकूण मकरसंक्रांत सणाचा उत्साह बाजारपेठेत बऱ्यापैकी दिसून आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com