Sambhaji Nagar News : आंग्लभाषा संस्थेचे स्थलांतर करण्याचा घाट ; मराठवाड्याचा शैक्षणिक विकास थांबणार

येथील राज्य आंग्लभाषा संस्था (इंग्रजी तज्ञत्व) या संस्थेचे पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेत समायोजन करण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयातील पदांचा आकृतिबंध अंतिम करण्याची कारवाई सध्या सुरू आहे.
Sambhaji Nagar News
Sambhaji Nagar Newssakal

छत्रपती संभाजीनगर : येथील राज्य आंग्लभाषा संस्था (इंग्रजी तज्ञत्व) या संस्थेचे पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेत समायोजन करण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयातील पदांचा आकृतिबंध अंतिम करण्याची कारवाई सध्या सुरू आहे. मात्र, या संस्थेच्या स्थलांतराला मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे.

शैक्षणिकदृष्ट्या मागास व दुर्गम भागातील अध्यापकांना राज्य आंग्लभाषा संस्थेच्या माध्यमातून इंग्रजी विषयाच्या विविध उपक्रमांचा लाभ होण्यासाठी व मराठवाडा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी संस्थेचे मुंबईतून छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतर करण्यात आले होते. या संस्थेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात इंग्रजी व मराठवाड्यात इतर शालेय विषयांसंदर्भात पूर्व प्राथमिक व उच्च माध्यमिक स्तरावर गुणवत्ता विकासासाठी कार्य केले जाते.

या संस्थेसाठी शहरात प्रशस्त इमारत असून सर्व सुविधा आहेत. मराठवाड्याच्या अनुशेषाची दरी भरून काढण्यासाठी व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी संस्थेच्या माध्यमातून काम सुरू आहे. असे असताना, या संस्थेतील संचालकपदासह इतर अनेक पदांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करून ही संस्था पुणे येथे स्थलांतर करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत.

अगोदरच मराठवाडा शैक्षणिकदृष्ट्या पिछाडीवर आहे. संस्थेच्या माध्यमातून मराठवाड्यात नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबविले जात असल्याने शैक्षणिक प्रगती सुरू होती. मात्र, ही एकमेव राज्यस्तरीय शैक्षणिक संस्था मराठवाड्यातून गेल्यास मराठवाड्याच्या शैक्षणिक विकासाला खीळ बसेल. त्यामुळे मराठवाड्याची शैक्षणिक अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी संस्थेतील सर्व पदे पूर्ववत ठेवणे, तसेच कामकाज पूर्ण क्षमतेने होण्यासाठी संस्थेचे स्थलांतर पुणे येथे करण्यात येऊ नये, अशी मागणी आमदार विक्रम काळे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

Sambhaji Nagar News
Latur Crime News : मुलीला जीवे मारून वडिलांनी संपवले जीवन ; आर्थिक अडचणीच्या नैराश्यातून घटना

संस्थेने केलेला शैक्षणिक विकास

प्रादेशिक विद्या प्राधिकरण संस्थेने छत्रपती संभाजीनगर येथून राज्यातील सुमारे दोन लाख शिक्षकांचे इंग्रजी विषयांच्या तेजस, स्पोकन इंग्लिश, मूक, अडव्हॉन्स स्पोकन इंग्लिश, रीड टू मी, इंग्लिश किट या विविध उपक्रमांच्या अनुषंगाने सक्षमीकरण केले. त्याचा फायदा राज्यातील सुमारे दहा लाख विद्यार्थी, पालकांना झाला आहे.

संस्थेने निधी उपलब्ध नसताना केलेली कामे

  • राज्यातील सर्व शिक्षकांसाठी उर्दू वाचन कार्यक्रम

  • ‘रीड टू मी’ कार्यक्रमाची राज्यभर अंमलबजावणी

  • तेजस प्रकल्पांतर्गत राज्यभर इंग्रजीच्या टॅग बैठका

  • पहिली ते बारावी इंग्रजी विषय शिक्षकांसाठी वेबिनार

  • मंगळवेढा (जि. सोलापूर) येथे इंग्लिश सिम्पोझियम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com