esakal | अवघ्या दहा दिवसांत उभारले व्हेंटिलेटर, ऑक्सिजनने सुसज्ज शंभर बेडचे हॉस्पिटल

बोलून बातमी शोधा

covid center
अवघ्या दहा दिवसांत उभारले व्हेंटिलेटर, ऑक्सिजनने सुसज्ज शंभर बेडचे हॉस्पिटल
sakal_logo
By
अविनाश संगेकर

लासूर स्टेशन (औरंगाबाद): सध्या सुरू असणाऱ्या कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमनामुळे सरकारी यंत्रणेसह खाजगी दवाखानेही कोरोना रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. या महामारीच्या काळात आधीच हाताला काम नसल्याने गरिबांचे मोठे हाल होत आहेत. गरीब रुग्णांना सरकारी दवाखान्याशिवाय पर्याय नाही. यामुळे त्यांचे उपचार होत नाहीत. बऱ्याच ठिकाणी उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटनाही घडत आहेत.

सामान्य गरजू गरीब लोकांना मोफत उपचार मिळावेत यासाठी लासूर स्टेशन येथे 100 ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरसह सुसज्ज असे कोविड हॉस्पिटल गंगापूर मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी अवघ्या दहा दिवसांत उपलब्ध करून दिले आहे.

हेही वाचा: औरंगाबादमध्ये वातावरणातून ऑक्सिजन निर्मितीचे अजून नऊ प्रकल्प उभारणार

या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी बंब यांच्या संकल्पनेतून ऑक्सीजन निर्मिती प्लांट उभारण्यात आला आहे. यासोबतच 100 बेड ऑक्सीजन सुविधेसह रुग्णसेवेत सुसज्ज करण्यात आले आहेत. यासोबतच अत्यावश्यक असे व्हेंटिलेटर बेडदेखील आहेत. या दवाखान्यात दाखल होणाऱ्या रुग्णांना सकाळी चहा-नाश्ता ते दोन वेळचे जेवण मोफत दिले जाणार आहे. सोबतच व्हेंटिलेटर, ऑक्सीजन बेडचा कुठलाही चार्ज लागणार नाही. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छांनी ऑनलाइन रुग्णालयाचे उदघाटन करण्यात आले.

हेही वाचा: औरंगाबादमध्ये शेतीच्या वादावरून महिलेला मारहाण; मारहाणीत महिलेचा गर्भपात

शिवना हॉस्पिटलचे डॉ.रणजित गायकवाड, शिहरे हॉस्पिटलचे डॉ.सचिन शिहरे आदींच्या मार्गदर्शाखाली अनेक तज्ञ अनुभवी डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये तसेच मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या कार्यकारी समितीच्या निगराणी खाली या दवाखान्यात कामकाज चालणार आहे, अशी माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली.