Samruddhi Mahamarg Accident : 'समृद्धी'वर पुन्हा भीषण अपघात; हडकोतील तिघे जागीच ठार, अज्ञात वाहनाला धडकली कार

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) अब्दीमंडी ते माळीवाड्यादरम्यान फोर्ड फिगो कार (Ford Figo Car) अज्ञात वाहनाला धडकली.
Samruddhi Highway Accident
Samruddhi Highway Accidentesakal
Summary

नाशिक येथील कार्यक्रमाला हे तिघे छत्रपती संभाजीनगरहून (Chhatrapati Sambhajinagar) समृद्धी महामार्गावरून कारने (एमएच २० ईई ०७४५) जात होते.

दौलताबाद : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) अब्दीमंडी ते माळीवाड्यादरम्यान फोर्ड फिगो कार (Ford Figo Car) अज्ञात वाहनाला धडकली. यात कारमधील (Car Accident) तीन प्रवासी जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी (ता. १०) रात्री अकराच्या सुमारास घडली. राहुल आनंद निकम (वय ४७, रा. सावंगी सारा परिवर्तन, हर्सूल), शिवाजी वामनराव थोरात (वय ५८, रा. द्वारकानगर, हडको एन-११) आणि अण्णा रामराव मालोदे (वय ७१, रा. नवजीवन कॉलनी, हडको एन-११) अशी मृतांची नावे आहेत, अशी माहिती घाटी रुग्णालयाचे आरएमओ डॉ. मुद्दसर अन्सारी यांनी दिली.

Samruddhi Highway Accident
Islampur Politics : अजितदादांच्या व्यासपीठावर 'शिळ्या कढीला ऊत'; आमदार जयंत पाटलांना शह देणं अशक्य?

मृतांपैकी निकम यांचे नाशिक (Nashik) जिल्ह्यात गाव आहे. नाशिक येथील कार्यक्रमाला हे तिघे छत्रपती संभाजीनगरहून (Chhatrapati Sambhajinagar) समृद्धी महामार्गावरून कारने (एमएच २० ईई ०७४५) जात होते. निकम स्वतः कार चालवत होते. शहराबाहेर पडताच काही मिनिटांत रात्री अकराच्या सुमारास अब्दीमंडी ते माळीवाडादरम्यान चॅनल क्रमांक ४३८ च्या जवळ त्यांची कार समोर असलेल्या अज्ञात जडवाहनाला मागून धडकली. कार वेगात असल्याने तिचा चेंदामेंदा झाला.

दरम्यान, कारच्या दोन्ही एअरबॅग उघडून फाटल्या. त्यामुळे कारमधील तिघांचाही जागीच मृत्यू झाला. महामार्ग पोलिस विभागाचे विनोद भालेराव आणि दौलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे आणि माजी नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी रुग्णालय गाठत परिस्थितीचा आढावा घेतला. निकम यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे, तर थोरात आणि मालोदे सेवानिवृत्त आहेत.

Samruddhi Highway Accident
कोल्हापूर-सांगली महामार्गाचं चौपदरीकरण अद्याप लटकलेलंच; मंत्री नितीन गडकरींच्या घोषणेचं काय झालं?

सलग दुसऱ्या दिवशी दुर्घटना

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका काही महिन्यांपासून खंडित झाली होती. दरम्यान, शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अपघात झाला होता. त्या घटनेत जालना जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला होता. शनिवारी (ता. १०) सलग दुसऱ्या दिवशी या महामार्गावर पुन्हा अपघात झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com