

Farmers Protest
sakal
कन्नड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत असलेल्या विठ्ठलपूर शिवारातील मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या टोमॅटोला शुक्रवारी (ता. २४) केवळ दोन ते तीन रुपये प्रतिकिलो दर मिळाला. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टोमॅटोची क्रेट ओतून तब्बल पाच तास रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहतूक पाच तास वाहतूक ठप्प झाली होती.